पहिल्यांदाच दोन घटस्फोटांबाबत अखेर बिपाशाच्या पतीनं सोडलं मौन...

Karan Singh Grover :  करण सिंग ग्रोव्हरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बिपाशाच्या पतीनं दोन घटस्फोटावर केलं वक्तव्य...

दिक्षा पाटील | Updated: Jun 21, 2024, 04:42 PM IST
पहिल्यांदाच दोन घटस्फोटांबाबत अखेर बिपाशाच्या पतीनं सोडलं मौन... title=
(Photo Credit : Social Media)

Karan Singh Grover on divorce : अभिनेता करण सिंग ग्रोवर अभिनेत्री बिपाशा बासूसोबत आनंदानं घालवत आहे. त्यांना एक मुलगी देखील आहे. मात्र, बिपाशाच्या आधी त्याचं दोन वेळा लग्न झालं आहे आणि दोन्ही वेळा त्याचा घटस्फोट झाला. पहिलं त्यानं श्रद्धा निगमशी आणि दुसऱ्यांदा अभिनेत्री जेनिफर विंगेटशी लग्न केलं. करण सिंग ग्रोवरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दोन्ही अपयशी लग्नांवर आणि घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे. त्यानं सांगितलं की ते चांगल्यासाठीच झालं. 

करण सिंग ग्रोवर पहिलं लग्न हे 2008 मध्ये श्रद्धा निगममध्ये झालं. पण 10 महिन्यांनंतर त्यांनी घटस्फोटाचा अर्ज दिला आहे. मग 9 एप्रिल 2012 ला करणनं जेनिफर विंगेटशी लग्न केलं. लग्नाच्या आधी करण आणि जिनेफर बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचं लग्न हे फक्त दोन वर्ष टिकलं आणि 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर करण सिंग ग्रोव्हरनं बिपाशा बासूसी 2016 मध्ये लग्न केलं आणि तिच्यासोबत तो आनंदी आयुष्य जगत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

करण सिंग ग्रोव्हरनं घटस्फोट आणि मोडलेल्या संसाराविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. 'ईटाइम्स' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की 'ब्रेकअप किंवा घटस्फोटात काही चांगलं नसतं. हो, नंतर जेव्हा लोकं पुढे जातात, तेव्हा त्यांना जाणीव होते की हे चांगल्यासाठी झालं आहे. ही तर चांगली गोष्ट आहे.' 

करणनं पुढे सांगितलं की 'पण मला कधीच माझ्या आयुष्यात होणाऱ्या गोष्टींविषयी बोलण्याची गरज भासली नाही. कारण मी आशा करत नाही की लोक येऊन मला त्यांच्या आयुष्यातील काही गरज नसलेल्या गोष्टींविषयी चर्चा करतील. हा माझा उद्देश नाही. मला प्रेमानं आणि आनंदानं सगळ्यांसोबत राहायला आवडतं. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यातील अडचणींचा सामना करावा लागतोय आणि मला वाटतं की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या अडचणींचा आणि संकटांचा सामना करण्यासाठी प्रायव्हसीची गरज असते.' 

हेही वाचा : कोण आहे ही कंगना...? प्रेस कॉन्फरन्समध्ये अभिनेत्यानं अभिनेत्रीला ओळखण्यास दिला नकार

करण सिंग ग्रोव्हर आणि बिपासा बासूची पहिली भेट 2015 मध्ये 'अलोन' च्या सेटवर झाली. याच सेटवर त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम झालं आणि एका वर्षांत त्यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाली आणि त्यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव देवी आहे.