Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईत असलेल्या घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता. त्याप्रकरणात पोलिस चौकशी करत आहेत. पोलिसांनी गोळीबार प्रकरणता पाचव्या आरोपिला अटक केली आहे. न्यूज एजेंसी एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, पाचव्या आरोपीला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. आरोपीचं नाव मोहम्मद चौधरी आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की मोहम्मद चौधरीनं गोळीबार करणारे दोन्ही आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ताला पैसे देण्याची आणि रेकी करण्यासाठी मदत केली आहे. आज पाचव्या आरोपीला मुंबईत घेऊन येणार आहेत, जिथे त्याला कोर्टात सादर करण्यात येईल आणि त्याच्या कस्टडीची मागणी करण्यात येईल.
सलमान खानच्या गॅलेक्सी या अपार्टमेंटच्या बाहेर 14 एप्रिलला गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी हे मोटरसायकलवर बसून फरार झाले होते. या प्रकरणात मुंबई पोलिस क्राइम ब्रांच तपास करत आहेत. पोलिसांनी गुजरातच्या कच्छमधून गोळीबार करणाऱ्या सागर पाल आणि विकी गुप्ता या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पंजाबमधून अनुज थापन आणि सोनू कुमार चंदर बिश्नोई या आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपी अनुज थापननं पोलीस कोठडीत आत्महत्या केली.
या प्रकरणात अनुज थापनवर नेमबाजांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप होता. अनुज थापननं 1 मे रोजी आत्महत्या केली होती. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, तर तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. अनुजच्या आत्महत्येनंतर या प्रकरणानं गंभीर वळण घेतलं. आता या प्रकरणातील पाचव्या अटकेमुळे सलमान खानच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : 'मला संपूर्ण माहित नव्हतं!' शेखर सुमनसोबत केलेल्या ओरल सेक्स सीनवर बोलली मनीषा कोइराला
26 एप्रिल रोदी अनुज थापनच्या अटकेनंतर या तपासात यश मिळालं आहे. यामुळे हल्ल्याच्या गुन्हेगारांना शस्त्रे पुरवण्यासाठी जबाबदार असलेल्या नेटवर्कवर प्रकाश पडला. 14 एप्रिल रोजी मुंबईतील वांद्रे येथे अभिनेत्याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी पळून गेला होता. त्यानंतर झालेल्या अटकेमुळे या प्रकरणाचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचे उघड झाले. या प्रकरणात तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांना वॉन्टेड यादीत ठेवण्यात आलं आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी गोळीबाराच्या घटनेतील सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू केला होता.