'लग्न झालं', सलमानने स्वत: दिली कबुली... फोटोनंतर व्हिडिओमुळे एकच धुमाकूळ

त्यामुळे चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Updated: Mar 5, 2022, 05:40 PM IST
'लग्न झालं', सलमानने स्वत: दिली कबुली... फोटोनंतर व्हिडिओमुळे एकच धुमाकूळ title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या लग्नाची अनेक वर्षांपासून त्याचे चाहते वाट पाहत आहेत. प्रत्येक फंक्शनमध्ये सलमानच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला गेला आहे. पण प्रत्येक वेळी वेगळ्या पद्धतीने उत्तरे देऊन अभिनेता याबाबत बोलणं टाळताना दिसतो.

पण आता सलमान खानने स्वतः लग्न केल्याचा खुलासा केला आहे. एवढंच काय तर याबाबत व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओ सलमानचा जुडवा दिसत आहेत. एकीकडे सलमान 'हम आप के है कौन' या चित्रपटातील त्याच कोट पॅन्टमध्ये दिसत आहे, तर दुसरीकडे सध्याचा सलमान दिसत आहे. 

तरुण वयातील सलमान सध्याच्या भाईजानला विचारतो आणि लग्न... यावर सलमान बोलतो... लग्न झालं...

हा व्हिडीओ पोस्ट करताना सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे - झालं की नाही... ते जाणून घेण्यासाठी काही दिवसांत पाहा पुढील अपडेट!!!" सलमान खानचा हा व्हिडीओ पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडिओबाबत अधिक माहिती देणारा आणखीन एक व्हिडिओ तो लवकरच पोस्ट करणार आहे.