केरळमधील पूरग्रस्तांना सलमान खानची मोठी मदत

सगळीकडे होतेय चर्चा 

केरळमधील पूरग्रस्तांना सलमान खानची मोठी मदत  title=

मुंबई :  केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संपूर्ण देश धावून आला. प्रत्येकजण आपापल्या परिने मदत करत आहे. सरकारने मदतीचा हात पुढे केलाच पण बॉलिवूड सेलिब्रिटी देखील यामध्ये पुढे सरसावले आहेत. बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी मदतीचा हात पुढे केला आहे. करोडो रुपयांच दान दिलं आहे. सलमान खानने देखील मोठी मदत केरळकरता केली आहे. 

सलमान खान बॉलिवूडमध्ये आपल्या उदार स्वभावाकरता देखील ओळखला जातो. अनेकदा तो लोकांची मदत करताना दिसला आहे. मात्र सलमान या गोष्टी अनेकदा शेअर करणं टाळतो. याबाबत सलमान खानचा जवळचा मित्र जावेद जाफरीने सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. जावेद जाफरीने ट्विट केलं आहे की, सलमान खानने केरळ पूरग्रस्तांसाठी सीएम रिलीफ फंडमध्ये 12 करोड रुपयांच दान केलं आहे. हा माणूस खरंच खूप वेगळा आहे. किती लोकांचे आशिर्वाद याच्यासोबत आहेत. मी तुझा आदर तर करतचो पण मी तुझ्यावर खूप प्रेम देखील करतो. 

आपल्याला माहितच आहे सलमान खानच्या अगोदर अनेक बॉलिवूड कलाकारांनी केरळला मदत केली आहे. सलमान खानसोबतच अमिताभ बच्चन, शाहरूख खान, अक्षय कुमार, कंगना रानौत, कुणार कपूर यांनी मदत केली आहे. यामध्ये साऊथ स्टारचा देखील समावेश आहे. रजनीकांत, राम चरन आणि अल्लू अर्जून यांचा देखील समावेश आहे.