मुंबई : सलमान खान केवळ बॉलीवूड आणि त्याच्या चाहत्यांचाच लाडका नाही तर तो त्याच्या घरातील सर्वांचा लाडका मुलगा आणि भाऊ आहे. सलमान खानला तीन भाऊ आणि दोन बहिणी आहेत तसंच त्याला सलमा खान आणि हेलन या दोन आई आहेत. त्याचे वडील सलीम खान.
घरातील सगळे सदस्य सलमान खानवर खूप प्रेम करतात. मात्र तुमच्यापैकी फार कमी लोकांना माहित असेल की, सलमान खान आपलं आयुष्य कोणासोबत घालवतो. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सलमान खान जगात सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करतो.
सलमान खान त्याच्या दोन बहिणी अलविरा आणि अर्पिता खानवर सगळ्यात जास्त प्रेम करतो. अलविरा खानबद्दल तुम्हा सर्वांना माहीत असेलच. पण अर्पिताबद्दल असं एक सत्य आहे जे फार कमी लोकांना माहीत आहे. अर्पिता ही सलमान खानची खरी बहीण नाहीये. अर्पिताला सलमान खानचे वडील सलीम खान यांनी दत्तक घेतलं होतं हे खरं आहे.
सलमान खानची फॅमिली आधीच पूर्ण झाली होती हे सगळ्यांना माहीत आहे. त्याला तीन भाऊ आणि एक बहीण. ही गोष्ट प्रत्येकाला माहितीये. मग अर्पिताला दत्तक का घेण्यात आलं? खरंतर सलमान खानचे वडील सलीम खान रोज मॉर्निंग वॉकला जायचे. एके दिवशी मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांना एका महिला दिसली, तिच्यासोबत एक लहान मूल होतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका चिमुरडीची आई तिला खाऊ देण्यासाठी भीक मागत होती. सलीम खान यांना तिची दया आली आणि त्यांना तिला दत्तक घ्यावसं वाटलं. काही दिवसांनी ती स्त्री मरण पावली आणि तिची मुलगी रस्त्यावर रडत होती. हे सगळं पाहून सलीम खान यांनी त्या मुलीला आपल्या कडेवर घेऊन आपल्या घरी आणलं.
खान कुटुंबाने अर्पिताचे मनापासून स्वागत केलं. प्रत्येकजण तिच्यावर खूप प्रेम करतो. सलीम खान अर्पिताला आपली लकी चार्म मानतो. त्याचबरोबर सलमान खान देखील अर्पिताला आपला लकी चार्म मानतो. अर्पिता ही केवळ सलमान खानचीच नाही तर संपूर्ण खान कुटुंबाचा प्राण आहे. अर्पिता खानला सलमान खानची आई हेलन यांनी दत्तक घेतलं आहे.