'चंद्रमुखी'ला 'मायरा'ची जोरदार टक्कर, सोशल मीडियावर मायराच्या ब्लाऊजची चर्चा

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील लाडक्या परीलाही 'चंद्रा' या गाण्याने भुरळ घातली आहे. तिने याबाबतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Updated: Apr 29, 2022, 01:56 PM IST
'चंद्रमुखी'ला 'मायरा'ची जोरदार टक्कर, सोशल मीडियावर मायराच्या ब्लाऊजची चर्चा title=

मुंबईः सध्या सर्वत्र 'चंद्रमुखी' या मराठी सिनेमाची जोरदार चर्चा आहे. विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'चंद्रमुखी' या चित्रपटातील गाणी सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत. या चित्रपटातील 'चंद्रा' या लावणीवर अनेकजण नाचताना दिसत आहे. त्याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत 


'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील लाडक्या परीलाही 'चंद्रा' या गाण्याने भुरळ घातली आहे. तिने याबाबतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत परी ही भूमिका साकारणाऱ्या मायरा वायकुळने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. 

या मालिकेतील छोट्या मायराच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. नुकतंच परीने या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातील एका गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात ती ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. 

या व्हिडीओवर अमृता खानविलकरनेही कमेंट केली आहे. ‘माझी गोंडस… माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे मायरा’, असे कमेंट तिने केली आहे. त्यावर मायराने ‘धन्यवाद…’ अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. दरम्यान ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. 

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे.