मुंबई : बॉलिवूडच्या दबंग सलमान खान आपला 56 वा वाढदिवस पनवेलच्या फार्महाऊसवर साजरा करत आहे. वाढदिवसाच्या एक दिवस आधी सलमान खानसोबत एक दुर्घटना घडली. फार्महाऊसमध्ये त्याला साप चावला. रात्री 3 वाजण्याच्या सुमारास साप चावला.
सलमानला साप चावल्यानंतर कुटुंबियांसह चाहत्यांची चिंता वाढली. जेव्हा सलमान खानला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. सलमान खानची चौकशी करण्यासाठी बॉलिवडूच्या स्टार अभिनेत्याचा पहिला फोन आला होता.
याबाबात अभिनेत्याने स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली आहे. अभिनेता धर्मेंद्र यांनी सलमान खानला साप चावल्याची बातमी कळताच त्यांनी तातडीनं चौकशीसाठी फोन केला. सलमान खानची तब्येत ठिक असल्याचं समजल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला.
एका चाहत्याला उत्तर देताना धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. सलमान खान आणि धर्मेंद्र यांच्यातील नातं वडील मुलासारखं असल्याचं सर्वांनाच माहिती आहे.
सलमानला साप चावल्यानंतर धर्मेंद्र यांना खूप टेन्शन आलं होतं. त्यांनी फोन करून तातडीनं चौकशी केली आणि सलमानची प्रकृती उत्तम असल्याचं कळल्यानंतर त्यांच्या जीवात जीव आला.