लंडनच्या ब्रीजवर स्वप्नील जोशीचा रोमान्स; 'या' अभिनेत्रीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!

Swwapnil joshi In london Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये स्वप्नील जोशी चक्क भर रस्त्यात रोमान्स करताना दिसतोय.

Updated: Sep 15, 2023, 08:09 PM IST
लंडनच्या ब्रीजवर स्वप्नील जोशीचा रोमान्स; 'या' अभिनेत्रीसोबतचा व्हिडिओ व्हायरल! title=
Romantic Video of swwapnil joshi and deepti devi

Swwapnil joshi Viral Video : प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी (Swwapnil joshi) गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. छोट्या पडद्यावरून मोठा स्टार झालेला स्वप्नील सध्या मनोरंजनसृष्टीतील एक स्टार अभिनेता मानला जातो.  मालिका असो वा वेब सिरीज स्वप्निलने आपल्या अभिनयाचा दम दाखवून दिलाय. अशातच स्वप्निलने पुन्हा आपला मोर्चा सिनेमाकडे वळवल्याचं दिसून आलंय. गेल्या महिनाभरापासून स्वप्नील जोशी लंडनमध्ये  (London) आहे. अशातच आता स्वप्नील जोशीचा एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये स्वप्नील जोशी एका अभिनेत्रीसोबत ब्रीजवर रोमान्स करताना दिसतोय.

स्वप्नील जोशी याचा इंद्रधनुष्य या सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच सिनेमाच्या शुटिंगसाठी स्वप्नील लंडनमध्ये (Londan) आहे. या सिनेमामध्ये एकूण 7 अभिनेत्री आहेत. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे दीप्ती देवी (Deepti devi) हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये स्वप्नील जोशी चक्क भर रस्त्यात रोमान्स करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

जहां दोस्तों ने मिलकर लाई है ये बहार, असं कॅप्शन दिप्तीने देवीने दिलंय. स्वप्नील तुझ्याबरोबर शूटिंग करताना अजिबात भीती वाटत नाही आणि खूप कम्फर्टेबल असतं, असं दीप्तीने सोशल मीडियावर म्हटलंय. त्यामुळे आता मनोरंजन विश्वात चर्चेचा उधाण आल्याचं पहायला मिळतंय.

पाहा Video

सात अभिनेत्री कोण?

प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील या सात अभिनेत्री या सिनेमामध्ये असणार आहेत. एबीसी क्रिएशन्स निर्मित ‘इंद्रधनुष्य’ या चित्रपटाच्या शूटिंगला लंडनमध्ये मागील महिन्यात सुरुवात झाली होती. सागर कारंडे देखील या सिनेमात दिसणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.