Anjali Anand 4 Lines 200 Takes Panic Attacks: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट सध्या सर्वत्र चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू होताना दिसत आहेत. यावेळी या चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजली असून यावेळी या चित्रपटातील अनेक पात्रांची भुमिकाही प्रचंड गाजताना दिसते आहे. यावेळी आलिया आणि रणवीरच्याही भुमिका प्रचंड गाजताना दिसत आहे. परंतु यावेळी चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका अभिनेत्रीची. जिनं या चित्रपटातून रणवीर सिंगच्या म्हणजेच रॉकीच्या बहीणीची भुमिका केली आहे. या अभिनेत्रीचीही सध्या चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. या अभिनेत्रीचं नावं आहे अंजली आनंद. या चित्रपटात तिनं गोलूची भुमिका केलेली आहे. यात तिचं नावं हे गायत्री रांधवा हे पात्र साकारलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून आपला एक अनुभव शेअर केला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. मध्यंतरी तिनं आपला आपल्याला वजनावरून केलेल्या ट्रोलिंगचा अनुभव सांगितला होता.
अंजली आनंदनं 'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोमधूनही सहभाग दाखवला होता. यावेळीही तिनं आपल्या या ट्रोलिंगबद्दल सांगितले होते. नुकत्याच दिलेल्या सिद्धार्थ कनन यांच्या मुलाखतीतून सांगितले होते की, 200 टेक्स देताना तिला पॅनिक अटॅक्स येत होते. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की नक्की तिच्यासोबत असं काय झालं होतं?
''मी टीव्हीवर 15 पानांचे स्क्रिप्ट हे न अडखळता आणि पुर्ण आत्मविश्वासानं म्हणायचे. मला माझ्या त्या गोष्टीचा फार अभिमान आहे. त्यातून यावेळी मात्र चार ओळी बोलतानाही मला पॅनिक अटॅक येऊ लागले होते. त्यासाठी माझे 200 टेक्स झाले होते. हे खरं आहे मी आहे गंमत करत नाही. परंतु यामुळे मला फारच दु:खही होत होते. मी अक्षरक्ष: रडू लागले होते. माझ्या डोळ्यातून पाणी ढळाढळा वाहू लागले होते. मला वाटलं होतं की आता मला हा रोल कधीच मिळणार नाही. मला हेही माहिती होतं हे मी कितीही प्रयत्न केला तरी होणार नाहीये परंतु ते शक्य झाले. परंतु माझा टेक शेवटी पुर्ण झालाच आणि सोबतच तो खुप चांगला झाला आणि हे पाहून मी खुपच खुश होते.''
यावेळी तिनं आपली ही ऑडिशन पास केली आणि तिची या चित्रपटात एन्ट्री आली. आपल्या नशीबावर ती भलतीच खुश झाली. सध्या तिचा हा अनुभव फारच सकारात्मक आहे.