'या' चित्रपटाच्या माध्यमातून रिया पुन्हा करणार पदार्पण

रिया आता मागचं सर्व काही विसरून तिच्या जीवनाची नव्याने सुरूवात करणार आहे.   

Updated: Jan 7, 2021, 08:49 PM IST
'या' चित्रपटाच्या माध्यमातून रिया पुन्हा करणार पदार्पण title=

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या समोरील अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्याच्या आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोवीक चक्रवर्तीला काही दिवस कारागृहात राहावे लागले. आता त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक संकटांचा सामना करणारी रिया आता पुन्हा नव्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

रिया आता मागचं सर्व काही विसरून तिच्या जीवनाची नव्याने सुरूवात करणार आहे. 2021 मध्य़े रियाचा 'चेहरे' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात रिया अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मीसोबत दिसणार आहेत. 

चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी रूफी जाफरी यांच्य़ा खांद्यावर आहे. यासंदर्भात त्यांनी नुकताच रियाची भेट घेतली आहे. रूफी म्हणाले, 'कठीण काळात प्रत्येक जण मजबूत होण्याचा सल्ला देतात. पण तो काळ फार वाईट असतो.' मात्र ती सर्व काही विसरून आयुष्याच्या नव्या टप्प्यासाठी तयार असल्याची प्रतिक्रिया रूफी यांनी दिली.