मुंबई : हाऊसफुल्ल ४ या चित्रपटाचा भाग असलेला अभिनेता रितेश देशमुख यानंही अक्षय कुमारच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय. पत्रकार करिश्मा उपाध्यायने फिल्ममेकर साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप केला. त्यानंतर दोन अभिनेत्रींनी देखील साजिद खानवर आरोप केले. अभिनेत्री सलोनी चोप्रा आणि रॅचल वाइट आता समोर आल्या असून त्यांनीही साजिद खानने अनेक महिने लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचं सांगितलंय.
या पाठोपाठ अक्षय कुमारने हाऊसफुल 4 चं शुटींग थांबविण्यास सांगितलं तर साजिद खानने हा सिनेमा करणं थांबवलंय. त्यानंतर नाना पाटेकरनेही सिनेमातून बॅकआऊट केलंय. यावर आता रितेश देशमुखने ट्विटी करुन आपलं मत नोंदवलंय.
— Riteish Deshmukh (@Riteishd) October 12, 2018
'महिलांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडायला सुरूवात केलीय. त्यांना सहन कराव्या लागलेल्या अन्यायाबद्दल वाईट वाटलं. आपल्या सर्वांना त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं' असं रितेश म्हणाला.
देशभरात सध्या सुरु असलेल्या #MeToo चळवळीनतंर आणि मोठ्या मोठ्या चेहऱ्यांवर झालेल्या आरोपांनंतर आता अभिनेता अक्षय कुमारने मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्य भूमिकेत असणाऱ्या हाउसफुल 4 सिनेमाचं शूटींग सोडून अक्षय कुमार इटलीहून भारतात परतला आहे. सिनेमाचं शूटींग थांबवण्याची मागणी त्याने निर्मात्यांकडे केली आहे.
अक्षय कुमारने सोशल मीडियावर हाउसफुल 4 च्या निर्मात्यांकडे मागणी केली आहे की, 'जोपर्यंत सिनेमातील आरोप झालेल्या लोकांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत सिनेमाचं शूटींग रद्द करण्याची मागणी त्याने केली आहे.'
अक्षय कुमारच्या आधी अभिनेता आमिर खान देखील गुलशन कुमार यांचा बायोपिक 'मुगल'मध्ये काम करण्यास नकार दिला आहे.
दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर आमीरने हा सिनेमा करण्यास नकार दिला आहे. निर्मात्यांनी ही हा सिनेमा सुभाष कपूर यांना या सिनेमातून हटवलं आहे.
अक्षयने म्हटलं की, 'तो अशा कोणत्याही व्यक्तीबरोबर काम नाही करणार जो दोशी ठरेल. ज्या महिलांवर अत्याचार झाले आहेत त्यांची पिडा समजून घ्यावी आणि त्यांना न्याय द्यावा.' अशी मागणी अक्षयने केली आहे.