सोनम कपूरच्या मुलाला मावशी रिया कपूरनं दिलं 'हे' नाव

रिया कपूरनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 27, 2022, 05:56 PM IST
सोनम कपूरच्या मुलाला मावशी रिया कपूरनं दिलं 'हे' नाव title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि पती आनंद अहुजा हे नुकतेच आई वडील झाले आहेत. त्यांच्या घरी एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. त्याचे फोटो आणि व्हिडाओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. सोनम, आनंद आणि त्यांच्या राजकुमाराच दणक्यात स्वागत करण्यात आलं. आता रिया कपूरनं सोशल मीडियावर त्याची झलक दाखवली आहे. व्हिडीओ शेअर करत रियानं सोनमच्या मुलाला एक नाव दिलं आहे. 

सोनम कपूरनं 20 ऑगस्टला मुलाला जन्म दिला. सोनम घरी आल्यानंतर रियानं बहिणीच्या मुलाचं स्वागत करत एक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत रियानं त्याचं नाव सांगितलं आहे. बेबी कपूर अहुजा असं एक पोस्टर इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत आमच्या सिंबाचं स्नागत असं कॅप्शन दिलं आहे.

 

Rhea Kapoor gave pet name to Sonam Kapoor and Anand Ahuja new born baby shared glimps of welcome

यायोबत आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत घर फुग्यांनी सजवलेलं दिसत आहे आणि सगळीकडे फुलं दिसत आहे. त्यामुळे सोनमच्या मुलाचं नाव सिंबा ठेवल्याचं म्हटलं जातं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याआधी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये आनंद अहुजा बाळाला हातात धरताना दिसत आहे. त्यानंतर सोनम त्याच्याकडे येते. मात्र, ती कॅमेऱ्यासमोर दिसल्यानं तिचा चेहरा दिसत नाही. यानंतर आनंद आणि सोनम त्यांच्या मुलाचे घरी स्वागत करण्यात आलं. या पूजेदरम्यान घरोघरी पाहिले जाते. आणखी एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये आनंद आणि अनिल पापाराझींना मिठाई वाटताना दिसत आहेत.