मुंबई: आपल्या अनोख्या लेखन शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या चेतन भगत याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित सर्वांचच लक्ष वेधलं आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तनाचा आरोप करत सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ज्यानंतर पुन्हा एकदा कलाविश्वात किंवा इतरही ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार आणि लैंगिक शोषणाच्या घटना उघडकीस आल्याचं पाहायला मिळालं.
#MeToo अंतर्गत आता अशीच एक घटना समोर येत आहे. ज्यामध्ये 'थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ', 'वन इंडियन गर्ल', 'टू स्टेस्ट' या सर्वाधिक खपांच्या पुस्तकांचा लेखक चेतन भगत याने खळबळजनक खुलासा केल्याचं पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियाच्याच मदतीने एका तरुणीने चेतनसोबतच्या गप्पांचे (चॅट)चे स्क्रीनशॉट पोस्ट केले असून, त्यावर आता खुद्द चेतनने स्पष्टीकरण दिलं आहे.
फेसबुकच्या माध्यमातून चेतनने एक भलीमोठी पोस्ट लिहित त्या माध्यमातून आपली चूक कबुल करत त्या युवतीची आणि आपल्या पत्नीचीही माफी मागितली आहे.
चेतनने आपण त्या मुलीसोबतच्या मैत्रीच्या नात्यामागचं सत्य उघडकीस आणलं आहे. तिने पोस्ट केलेले स्क्रीनशॉट हे खरे असल्याचं त्याने स्वीकारलं आहे.
त्या व्यक्तीची आपण एक प्रकारे जोडलं गेल्याचंही त्याने स्वीकारलं. अचं असलं तरीही चुकीच्या भाषेत इतर कोणत्याच मार्गाने आपण तिच्या संपर्कात आलो नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं.
काही वर्षांपूर्वीचा हा प्रसंग असून, त्या व्यक्तीचा नंबरही आपण डिलीट केल्याचं त्याने सांगितलं यासोबतच आपल्या पत्नीची माफीही मागितली आहे.