सोनम कपूरचा ट्विटरला राम-राम!

अनिश्चित काळासाठी ट्विटरवरून दूर 

Updated: Oct 6, 2018, 03:28 PM IST
सोनम कपूरचा ट्विटरला राम-राम! title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर मायक्रोब्लॉगिंग सोशल वेबसाईट ट्विटरला अखेर राम राम ठोकलाय. नकारात्मक प्रतिक्रियांना कंटाळून सोनमनं हा निर्णय घेतल्याचं म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून सोनमला ट्विटरवर वेगवेगल्या मुद्यांवरून ट्रोल करण्यात येत होतं. 

६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.४० वाजता सोनमनं ट्विटरवर लिहिलं, 'मी काही काळासाठी ट्विटरपासून दूर जातेय. हे खूपच नकारात्मक होत चाललंय. सर्वांना शांती आणि प्रेम'... 

सोनमनं नेमक्या नकारात्मक प्रतिक्रिया किंवा कारण सांगितलं नसलं तरी ती आता अनिश्चित काळासाठी ट्विटरवरून दूर गेल्याचं तिनं म्हटलंय. 

नुकतंच एका ट्विटर युझरनं सोनमला मुंबईच्या प्रदूषणावरू टीका करण्याऐवजी सार्वजनिक वाहनांतून प्रवास करण्याचा सल्ला दिला होता.