मुंबई : इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर सौंदर्यांपैकी एक म्हणजे रेखा, रेखा यांचं आयुष्य नेहमीच वादांनी भरलेलं असतं. रेखा कधी त्यांच्या लग्नामुळे तर कधी अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेत असतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, 68 वर्षीय रेखा यांचं नाव केवळ अमिताभ बच्चन यांच्याशीच जोडलेलं जात नाही. मात्र एक वेळ अशी होती जेव्हा बॉलिवूडची ही दिग्गज अभिनेत्री स्वतःहून 13 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेता अक्षय कुमारवर फिदा झाली होती.
त्या काळात रेखा यांनी अक्षयसोबत जबरदस्त इंटिमेट सीन्सही दिले होते. त्यामुळेच रेखा आणि अक्षय कुमारची ही जवळीक मीडियाच्या नजरेतूनही सुटू शकली नाही. (Rekha Birthday At the age of 42 Rekha had become uncontrollable while doing love scenes 13 years younger co actor was injured with nails)
13 वर्षांनी लहान अक्षयसोबत दिले इंटीमेट सीन
1996 मध्ये रिलीज झालेल्या 'खिलाडियों का खिलाडी' या चित्रपटात रेखाने आपल्यापेक्षा 13 वर्षांनी लहान अभिनेता अक्षय कुमारसोबत अनेक लव्ह सीन्स दिले होते. यादरम्यान, बेडरूम आणि पूलच्या बाजूला इंटिमेट सीन दरम्यान रेखा यांचा ताबा सुटला होता. यादरम्यान अक्षय कुमारच्या पाठीवर तिने नखंही उरबाडली, ज्यामुळे अक्षय जखमी झाला होता. त्यावेळी रेखा 42 वर्षांची होती, तर अक्षय 29 वर्षांचा होता. या चित्रपटातील दोघांचे असे बोल्ड सीन्स पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
रेखा यांनी या चित्रपटात पहिल्यांदा नकारात्मक भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं आणि तो त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. अक्षय कुमार आणि रेखा व्यतिरिक्त या चित्रपटात रवीना टंडन देखील होती.
रेखा आणि अक्षयची जवळीक
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, 'खिलाडियों का खिलाडी' (Khiladiyon Ka Khiladi) च्या शूटिंगदरम्यान रेखा आणि अक्षय कुमार यांच्यातील जवळीक इतकी वाढू लागली होती की रेखा तिच्या घरून अभिनेत्यासाठी जेवण आणायच्या आणि ती आपला जास्तीत जास्त वेळ अभिनेत्यासोबत घालवायची. तुम्हाला सांगतो, 'खिलाडियों का खिलाडी' चित्रपटात अॅक्शनसोबतच खूप इंटिमेट सीन्सही आहेत. या चित्रपटात रेखा आणि अक्षयने अनेक इंटिमेट सीन्स (Rekha Ashay Intimate Scene)दिले होते. या चित्रपटातील अक्षय कुमार आणि रेखाचा बोल्डनेस चाहत्यांना खूप आवडला होता.