Rekha Birthday Special : बॉलिवूडच्या अभिनेत्री रेखा (Actress Rekha) यांचा आज वाढदिवस आहे. रेखा यांचं नाव घेतलं की, सर्वात आधी समोर येतात ते बॉलिवूडचे शंहशाह अमिताभ बच्चन (Amitabh bachchan). कारण या दोघांची केमेस्ट्री सिनेमांमध्ये जितकी चर्चेत आली होती. तितकीच ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ही चर्चेत होती. अमिताभ यांनी रेखा सोबतचे नाते कधीच सार्वजनिक ठिकाणी स्वीकारले नाही. पण रेखा यांनी आपल्या प्रेमाबद्दल अनेकदा कबुली दिली होती.
अमिताभ बच्चन यांनी रेखा (Amitabh and rekha) यांना नंतर का नाकारले याबाबत त्यांनी खुलासा केला होता. बॉलिवूडमधील अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्याकडे नेहमीच वादग्रस्त प्रकरण म्हणून पाहिले जाते. अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे विवाहबाह्य संबंध आहेत.
अमिताभ बच्चन यांचे लग्न नंतर जया बच्चन यांच्याशी झाले. त्याचवेळी रेखासोबतचे त्यांचे विवाहबाह्य संबंधही मीडियाच्या चर्चेत होते. अमिताभ बच्चन यांनी हे नातं का नाकारलं, याविषयीही रेखा यांनी खुलासा केला होता.
रेखा यांना विचारण्यात आले होते की, अमिताभ बच्चन यांनी हे नाते का नाकारले? त्यावर रेखा म्हणाल्या की, 'ते हे का करणार नाहीत? आपली प्रतिमा वाचवण्यासाठी त्यांनी हे केले. आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले. आपल्या मुलांना वाचवण्यासाठी त्यांनी हे केले. मला वाटते की ते सुंदर आहे. लोक याबद्दल काय विचार करतात याची मला पर्वा नाही. मी त्यांच्यावर किती प्रेम करते किंवा ते माझ्यावर किती प्रेम करतात हे लोकांना कळून काय करायचे. ते माझ्यावर प्रेम करतात आणि मी त्यांच्यावर प्रेम करते हेच खूप झाले. इतरांना काय वाटते याची मला पर्वा नाही.
रेखा म्हणाल्या होत्या की, 'लोकांना वाटत असेल की बिचारी रेखा वेडी आहे. पण त्यांचे 10 अफेअर नाहीत. अमिताभ बच्चन अजूनही जुन्या विचारांचे आहेत. त्यांना कोणालाही दुखवायचे नाही. त्यांना आपल्या पत्नीलाही दुखवायचे नाही. अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.