Rekha and Raveena Tandon Viral Video : बॉलिवूड अभिनेत्री रेखा (Rekha) आणि रवीना टंडन (Raveena Tandon) या लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. त्या दोघींचे लाखो चाहते आहेत. नुकताच रवीना आणि रेखाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओत त्यांचा रेड कार्पेटवर दोघे एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. रेखा आणि रवीनाला एकत्र गप्पा मारताना पाहून नेटकऱ्यांना त्या दोघांमध्ये झालेला एक वाद आठवला आहे. त्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. याचे कारण म्हणजे रेखा बऱ्याच दिवसांनंतर कोणत्यातरी कार्यक्रमात दिसल्या. पण मग सगळ्यांना आठवलेला वाद कोणता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर चला जाणून घेऊया... (Rekha And Raveena Tandon Viral Video)
रेखा आणि रवीनाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंद्र चावलानं शेअर केला आहे. या व्हिडीओत रेखा यांनी काळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर रवीनानं काळ्या आणि शिमरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यावेळी दोघे पापाराझींशी बोलताना दिसत आहेत. रवीनानं रेखा यांच्यासोबत सेल्फी देखील क्लिक केला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक काळ असा होता जेव्हा रेखा आणि रवीना दोघींची नाव ही अभिनेता अक्षय कुमारसोबत जोडले जात होते. रेखा त्यांच्यापेक्षा वयानं 13 वर्षांनी लहान असलेल्या अक्षयसोबत (Akshay Kumar) फ्लर्ट करत असल्याचं म्हटलं जात होतं, रिपोर्टनुसार, 1996 मध्ये आलेल्या 'खिलाडियों का खिलाडी' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय आणि रेखाची जवळीक वाढू लागली आणि लवकरच, अक्षय आणि रेखाचा रोमान्सच्या चर्चा इंडस्ट्रीत पसरू लागल्या, ज्यामुळे रवीनाला खूप असुरक्षित वाटू लागले.
हेही वाचा : पुन्हा एकदा Alia Bhatt होणार आई; बेबी बंपचा Video आला समोर!
रवीनाच्या म्हणण्यानुसार, अक्षय रवीनासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे माहित असूनही रेखा अक्षयसोबत जवळ येण्याचा प्रयत्न करत होत्या. Rediff.com ला दिलेल्या जुन्या मुलाखतीत रवीना म्हणाली, 'मला वाटत नाही की अक्षयचा रेखा यांच्याशी काही संबंध असेल. खरं तर, तो त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. अक्षयनं रेखा यांना चित्रपटामुळे सहन केलं. एका वेळेनंतर रेखा यांनी अक्षयसाठी घरातून जेवणाचा डब्बा आणायला सुरुवात केली होती. त्यावेळी मी हस्तक्षेप केला कारण या गोष्टी मर्यादेचा पलीकडे जात असल्याचे मला दिसले.
मात्र, रवीना किंवा रेखा या दोघांनी या बातम्यांवर कधीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आता जेव्हा नेटकऱ्यांनी त्या दोघांना एकत्र पाहिले तेव्हा त्यांना धक्का बसला आहे. अनेकांना कमेंट करत अक्षय कुठे आहे? असा प्रश्न केला आहे. (Raveena and Akshay Kumar Relationship)