मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. इतके वर्ष झाले तर रवीनाच्या चाहत्यांच्या कमी झालेली नाही. रवीनानं आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. रवीना ही फक्त तिच्या सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत नसते. तर तिच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. आजही तिचे लाखो चाहते आहेत. मात्र, रवीनाचा एक असा चाहता होता ज्यानं वेडेपणाच्या सगळ्या हद्द पार केल्या होत्या.
रवीनानं तिच्या एका चाहत्याच्या या वेडेपणाबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होते. रवीनानं सांगितलं होतं की तिचा एक चाहता होता, जो रवीनाच्या मुलांना त्याची मुलं म्हणायचा आणि त्यानं हे मान्य केलं होतं की रवीनाचं त्याच्याशी लग्न झालं आहे.
हेही वाचा : घटस्फोटामुळे चर्चेत असलेल्या सेलिब्रिटी कपलच्या अडचणीत वाढ, पतीने मारहाण केल्यामुळे अभिनेत्री म्हणते...
ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत रवीना म्हणाली, 'तिचा हा चाहता गोव्यातील होता, त्यानं मान्य केलं होतं की मी त्याच्याशी लग्न केलं आहे आणि माझी मुलं ही त्यांची मुलं आहेत. तो कुरिअरद्वारे त्याच्या रक्ताने भरलेल्या बाटल्या मला पाठवायचा. तो रक्ताने पत्र लिहायचा आणि अश्लील फोटोही पाठवायचा.'
रवीना पुढे म्हणाली, 'एकदा तिचा पती अनिल थडानी यांच्या गाडीवर कोणीतरी मोठा दगड फेकला, त्यानंतर तिनं पोलिसांना बोलावावे लागले.' रवीना पुढे म्हणाली, 'असाच आणखी एक चाहता होता. तो माझ्या घराच्या गेटवर बसायचा. अशा लोकांमुळे रवीना खूप नाराज झाली होती. तिला लोकांच्या वेडेपणाची भीती वाटत होती. रवीनाचे काही चाहते तिच्यासाठी डोकेदुखी ठरले होते.'
रवीनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रवीना सगळ्यात शेवटची KGF 2 मध्ये दिसली होती. या चित्रपटातील तिची भूमिका आणि अभिनय सर्वांनच्या पसंतीस उतरला होता. रवीना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात असते. रवीनानं आजही जर फोटो शेअर केले तर त्या फोटोंना लाखोच्या संख्यात लाइक करण्यात येत. (raveena tandon reveals his fan used to send her vials of blood through courier and called actress wife and her childrens his)