मुंबई : सोशल मीडियावर फेक फॉलोअर्स आणि लाईक्स वाढवल्या प्रकरणी रॅपर बादशाहाची मुंबई पोलिसांकडून तब्बल १० तास चौकशी करण्यात आली. जवळपास शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत बादशाह उर्फ आदित्य प्रतीक सिंह सिसोदियाची चौकशी सुरू होती. गेले दोन दिवस याप्रकरणी मुंबई पोलीस बादशाहची चौकशी करत आहेत. त्यामुळे आता त्याच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांनी आज देखील त्याला चौकशीसाठी पोलीस स्थानकात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बादशाहला तब्बल २३८ प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. सांगायचं झालं तर सोशल मीडियावर बादशाहच्या सर्वच गाण्यांना असंख्य व्यूज मिळतात. पण खटकणारी एक गोष्ट म्हणजे, त्याच्या प्रत्येक गाण्याला १०० च्या घरातचं कमेंट मिळतात. हाच मुख्य प्रश्न सध्या पोलिसांना सतावत आहे.
Mumbai: Rapper Badshah arrives at Crime Branch for questioning in fake followers racket case. https://t.co/UFZDDgTv1n pic.twitter.com/lYMka18DBf
— ANI (@ANI) August 7, 2020
बादशाहच्या 'पागल हैं' गाण्याला एका दिवसांत ७५ मिलियन व्यूज मिळाले आहेत. मात्र गुगलने बादशाहचा हा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे. त्यात गेल्याकाही दिवसांमध्ये बादशाहच्या unfollowers च्या यादीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली.
त्यामुळे आता पोलिसांनी बाहशाहच्या फॉलोअर्स ची लिस्ट मागितली आहे. शिवाय मिळालेल्या माहितीनुसार आता अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोणची देखील या प्रकरणी तपासणी होणार आहे.