मुंबई : गेल्या वर्षी अनेक सेलिब्रिटींनी लग्न केलं. अगदी ठराविक लोकांच्या उपस्थितीत प्रसिद्ध सेलिब्रिटींनी नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता विकी कैशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ. लग्नानंतर विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. एवढंच नाही तर, लग्नानंतरही हे कपल इतरांना कपल गोल्स देताना दिसतात. पण आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका अभिनेत्याने विकीच्या ऐपतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता रणवीर सिंग आहे.
नुकताच फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा मोठ्या उत्साहात साजरा पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये होस्टच्या भूमिकेत असलेला रणवीर अनेक सेलिब्रिटींसोबत मज्जा-मस्ती करताना दिसत आहे.
यावेळी अभिनेत्याने विकी आणि कतरिनावर देखील निशाणा साधला. रणवीर म्हणाला, 'मी आणि विकी उंच, सावळे प्रसिद्ध अभिनेते आहोत. आम्ही आमच्या आईचे लाडके आहोत... पण मी आणि विकीने अशा मुलींसोबत लग्न केलं आहे, ज्या आमच्या ऐपतीच्या बाहेर आहेत...' पाहा व्हिडीओ...
रणवीर सिंगच्या या स्टाईलवर सगळेच हसायला लागतात, अगदी विकी आणि कतरिनाही आपल्या हशावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, बी-टाऊनमधील स्टार कपल कतरिना-विकी यांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. अनेकांना कतरिना-विकी लग्न करणार यावर विश्वास बसत नव्हता. त्यात दोघांनी स्टार कपलने आपलं प्रेम लग्न हे सर्व कसं कायम गुपित ठेवलं होतं.
त्याचा लग्नही खूप प्राइव्हेट ठेवण्यात आलं होतं. या लग्नाचे आणि मेहंदी-हळदीचे सुंदर अस्मरणीय फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.