एक Kiss केलेलीसुद्धा नको; 'त्यांना' हव्या होत्या व्हर्जिन अभिनेत्री; Mahima Chaudhry कडून कटू सत्य समोर

 Mahima Chaudhry नं समोर आणला बॉलिवूडचा खरा चेहरा... 

Updated: Sep 13, 2022, 11:56 AM IST
एक Kiss केलेलीसुद्धा नको; 'त्यांना' हव्या होत्या व्हर्जिन अभिनेत्री; Mahima Chaudhry कडून कटू सत्य समोर  title=
Bollywood Actress Mahima Chaudhry revealed dirty secret of film industry as it demanded virgin actress

Mahima Chaudhry Birthday : (Bollywood) बॉलिवूड.... एक क्षेत्र नव्हे, स्वप्नच म्हणावं लागेल. असंख्य स्वप्न पूर्ण करणाऱ्या या जादुई विश्वाचं प्रत्येकालाच कुतूहल. पण, याच विश्वाचं दुसरं रुप इतकं हादरवणारं आहे, जे कळताच कसं बुवा ही कलाकार मंडळी इथं तग धरतात? हाच प्रश्न तुम्हीही विचाराल. अभिनेत्री (Mahima Chaudhry )  चौधरीनं एका मुलाखतीदरम्यान बॉलिवूडचा हाच न पाहिलेला चेहरा सर्वांसमोर आणला होता. अभिनेत्री म्हणून नावारुपास येताना तिनं नेमका कोणत्या प्रसंगांचा सामना केला होता, यावर प्रकाश टाकला. 

'परदेस' (Pardes) चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या महिमानं हिंदी चित्रपटसृष्टी अभिनेत्रींसाठी किती बदललीये? या प्रश्नाचं उत्तर देताना जरा स्पष्ट बोलली. पूर्वीच्या तुलनेत आता अभिनेत्रींना चांगलं मानधन, चांगल्या भूमिका आणि मानसन्मान मिळत असल्याचं सांगत याबाबत आनंद व्यक्त केला. 

काही वर्षांपूर्वी मात्र ही परिस्थिती नव्हती, याचविषयी सांगताना ती म्हणाली 'तुम्ही जर कोणाला डेट करत आहात तर त्या पद्धतीच्या चर्चा सुरु व्हायच्या. तुम्ही एक अभिनेत्री आहाता आणि विवाहित आहात तर, विसरूनच जा की हे कलाविश्व तुमच्यासाठी आहे. कारण, तेव्हा तर तुमचं करिअरच संपल्याचं समजलं जात होतं'. 

पाहा : केस गळले, चेहरा बदलला; Breast Cancer मुळं अशी दिसतेय महिमा चौधरी

काही वर्षांपूर्वी परिस्थिती अशी होती, की इंटस्ट्रीमध्ये Virgin अभिनेत्रींचीच निवड चित्रपटांसाठी केली जात होती. तेव्हा एक अशी अभिनेत्री हवी असे, जिनं Kiss सुद्धा केलं नसेल. ज्यावेळी आपण चित्रपटांमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा एका अभिनेत्रीचं Maratial Status अतिशय महत्त्वाचं होतं, असं म्हणत महिमानं त्या काळच्या परिस्थितीविषयी नाराजीचा सूर आळवला. 

अभिनेत्रींच्या इतक्या खासगी आयुष्याचा कलाजगताशी काय संबंध, त्यांच्या Virginity चं काय करायचंय? असा सवाल तिची ही मुलाखत समोर आल्यानंतर काही नेटकऱ्यांनी केला. कलाजगताच्या या कटू सत्याच्या अनेकांनीच धिक्कार केला.