मुंबई : संजय लीला भन्साली यांच्या बहुचर्चीत ‘पद्मावती’ सिनेमातील दीपिकाचा जबरदस्त फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. यासोबतच या सिनेमातील आणखी एक गोष्ट जोरदार चर्चेत आहे.
या सिनेमात रणवीर सिंह अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारत असून यात तो एका महिलेसोबत नाही तर पुरुषासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
याबाबत खास माहिती समोर आली की, रणवीर सिंह हा या सिनेमात अभिनेता जिम सारबसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ऎतिहासिक संदर्भांनुसार अल्लाउद्दीन खिलजी हा बायोसेक्श्युअल होता. तो एका पुरुषाच्या प्रेमात होता. कथेत संजय लीला भन्साली यांनी हा विषयही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
खरंतर या सिनेमाबाबत एकही बातमी लीक होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे हे पूर्णपणे कन्फर्म नाहीये की, भन्साली हे हा मुद्दा सिनेमात दाखवतील की नाही. तसे सांगितले जात आहे की, जिम सारब अशा भूमिकेत आहे, ज्यात तो रणवीर सिंहसोबत रोमान्स करताना बघायला मिळेल. येत्या १ डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.