रणवीर-अमृताचा जबरदस्त डान्स व्हिडिओ...

रणवीर सिंगची भूरळ तरूणींवर होतीच. पण पद्मावतनंतर त्यात अधिक भर पडली, असे म्हणायला काही हरकत नाही. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 19, 2018, 11:28 AM IST
रणवीर-अमृताचा जबरदस्त डान्स व्हिडिओ... title=

मुंबई : रणवीर सिंगची भूरळ तरूणींवर होतीच. पण पद्मावतनंतर त्यात अधिक भर पडली, असे म्हणायला काही हरकत नाही. वादग्रस्त ठरलेल्या पद्मावतला प्रदर्शनानंतर चांगला प्रतिसाद मिळाला. मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने रणवीर सिंगसोबत खलीबली गाण्यावर जबरदस्त डान्स केला.

पहा त्यांचा डान्स व्हिडिओ

रणवीर सिंग  Magnetic Maharashtra Convergence 2018 प्रोगॅममध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाला होता. यादरम्यान दोघांनी एकत्र डान्स केला. अमृताने या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो व्हिडिओ पाहुन नक्कीच तुम्हाला हसू आपरणर नाही.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर देखील शेअर केला आहे. या व्हिडिओत अमृता आणि रणवीरचा मजेशीर अंदाज पाहायला मिळत आहे. 

 

रणवीरविषयी अमृता म्हणते की...

हा व्हिडिओ शेअर करत अमृताने लिहिले की, चांगल्या गोष्टी नेहमी एका पॅकेजच्या स्वरुपात येतात आणि माझ्यासाठी ते पॅकेज फक्त रणवीर सिंग आहे. आपल्या असण्याने रणवीर सर्व वातावरणात एनर्जी भरतो. त्याचा स्वभाव खूप चांगला असून त्याच्याकडुन खूप काही शिकायला मिळते. 

गाण्यावर विषेश मेहनत

पद्मावत चित्रपटातील खलीबली हे गाणे खूप लोकप्रिय झाले. या गाण्याची कोरियोग्राफी प्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्यने केली आहे. गणेश आचार्यने फक्त नृत्यावर नाही तर त्याच्या हावभावांवरही विशेष मेहनत घेतली आहे.