'Ranbir Kapoor माझे कपडे चोरायचा आणि...', रिद्धीमाचा भावाबद्दल मोठा खुलासा

रणबीरवर का आली बहिणीचे कपडे चोरण्याची वेळ? रिद्धीमाने कारण सांगितल्यानंतर नीतू कपूरही Shocked!  

Updated: Sep 28, 2022, 11:07 AM IST
'Ranbir Kapoor माझे कपडे चोरायचा आणि...', रिद्धीमाचा भावाबद्दल मोठा खुलासा title=

मुंबई : बॉलिवूडमधील कपूर कुटुंब (kapoor family) म्हटलं तर त्यांच्याबद्दल काही मजेदार गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आज अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) वाढदिवस आहे. तर अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेवू. भावंड अकमेकांचे कपडे किंवा इतर गोष्टी शेअर करतात. पण रणबीरतर बहिणीचे कपडे चोरायचा आणि गर्लफ्रेंडला द्यायचा. या गोष्टीचा खुलासा चक्क रिद्धीमाने केला आहे. (riddhima kapoor sahni)

एकदा विनोदवीर कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये रिद्धीमा आणि नितू कपूर (Nitu Kapoor) उपस्थितीत होत्या. तेव्हा रिद्धामाने सांगितलं. 'मी लंडनहून सुट्ट्यांसाठी घरी आली होती. तेव्हा रणबीरची गर्लफ्रेंड (Ranbir girlfriend) घरी होती आणि तिने माझा टॉप घातला होता. जो मी अनेक दिवसांपासून शोधत होती...'

पुढे रिद्धीमा म्हणाली, 'रणबीर माझे कपडे चोरुन त्याच्या गर्लफ्रेंडला द्यायचा...' रिद्धीमाने हा किस्सा सांगितल्यानंतर नितू कपूर देखील चक्क झाल्या. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

कपूर आणि भट्ट कुटुंबात आनंदाचं वातावरण
आज कपूर आणि भट्ट कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. रणबीरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मंगळवारी रात्री रणबीर-आलियाच्या घरी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 

रणबीर आणि आलिया (Alia bhatt) लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहेत. काही महिन्यांपूर्वी आलियाने सोनोग्राफीचा फोटो शेअर करत  चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.