Ranbir Kapoor On PM Modi : रणबीर कपूर हा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असून रामायण चित्रपटामुळे तो सध्या चर्चेत असतो. पण सध्या तो राजकारण आमि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शाहरुख खानशी केल्यामुळे चर्चेत आहे. नुकताच निखिल कामथच्या पॉडकास्टवर तो दिसून आला. या मुलाखतीत त्याने वैयक्तिक आयुष्य, राहा, आलिया अगदी वडिलांबद्दल अनेक गुपित सांगितले. एवढंच नाही तर राजकारण आणि पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या मुलाखतीबद्दलही त्याने या मुलाखतीत सांगितलंय.
जेव्हा निखिल कामथने त्यांना राजकारणाबद्दल त्यांचे मत विचारलं तेव्हा रणबीर कपूरने सांगितलं की, तो राजकारणाचा फारसा विचार करत नाही, पण तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चाहता आहे. रणबीर कपूर म्हणाला, 'मी राजकारणाचा फारसा विचार करत नाही, पण आम्ही सर्व कलाकार आणि दिग्दर्शक 4 ते 5 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेलो होतो. आपण त्यांना दूरदर्शनवर पाहा. तो कसा बोलतो ते तुम्ही पाहता. तो एक उत्तम वक्ते आहेत. मला तो क्षण आठवतो जेव्हा आम्ही बसलो होतो आणि ते आत आले. त्यांच्या आत चुंबकीय आकर्षण आहे. ते येऊन बसले. त्यांनी प्रत्येक व्यक्तीशी काही वैयक्तिक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यावेळी माझे वडील उपचारासाठी जात होते, म्हणून त्यांनी मला विचारलं की उपचार कसे चालले आहेत, काय होत आहे. ते आलिया, विकी कौशल, करण जोहर यांच्याशी खूप बोलले.
रणबीर कपूर पुढे म्हणाला की, 'अनेक महान व्यक्तींमध्ये असे प्रयत्न त्यांनी पाहिले आहेत. ते असे प्रयत्न करतात, पण त्यांना त्याची गरज नसते, तरीही ते करतात. शाहरुख खानही हे करतो. असे अनेक महान लोक आहेत. यातून त्याच्याबद्दल बरंच काही कळतं.'
या मुलाखतीत निखिल कामथ यांनीही मोदीसंदर्भात एक अनुभव रणबीर कपूरशी शेअर केला. तो म्हणाला, 'मी त्यांचा आदर करतो आणि प्रशंसा करतो. एकदा आम्ही अमेरिकेत, वॉशिंग्टन डीसीला होतो आणि ते आमच्याशी आणि काही अमेरिकन व्यावसायिकांशी सकाळी 8 वाजता एका खोलीत भेटले. त्यानंतर त्यांनी सकाळी 11 वाजता इतरत्र भाषण केलं, त्यानंतर दुपारी 1 वाजता उपराष्ट्रपतींसोबत बैठक घेतली. मग ते दुपारी 4 वाजता काहीतरी करायचे. रात्री 8 वाजता त्यांना दुसरे काही काम असायच. त्यानंतर रात्री 11 वाजता दुसरे काम. पण मी रात्री 8 पर्यंत मी थकलो होतो. दोन दिवसांनी माझी तब्येत बिघडू लागली. पण पुन्हा तेच काम करण्यासाठी ते इजिप्तला जाणार होते. या वयातही त्याची ऊर्जा जबरदस्त आहे. त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.'