Alia Bhatt and Ranbir Kapoor's Daughter Raha Got This Gift : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या आयुष्यात नुकत्याच एका पाहूणीनं आगमन केलं आहे. त्यांच्या मुलीचं नाव राहा असं आहे. जन्मापासून राहा ही सतत चर्चेत आहे. राहाच्या जन्मापासून तिला अनेकांनी भेटवस्तू पाठवल्या आहेत. त्यात एक खास भेटवस्तू राहासाठी आली आहे. त्या भेटवस्तूचे फोटो आलियानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आलियानं तिच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आलियानं डिझायनर अनैता श्रॉफ अदजानिया आणि पुरकल स्त्री शक्तीकडून एक खास भेट मिळाल्याचे सांगितले आहे. राहासाठी अनैता श्रॉफ अदजानियानं कस्टमाइज्ड हॅंडमेड रजाई भेट दिली आहे. रजाईचा फोटो शेअर करत आलियानं लिहिलं की 'धन्यवाद माझ्या प्रिय अनैता आणि पुरकल.' रजाईच्या एका बाजूला 'आलिया आणि रणबीर' लिहिलेले आहे, तर दुसऱ्या बाजूला 'राहा' हे नाव लिहिले आहे. आलियानं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. (ranbir kapoor alia bhatt daughter raha kapoor gets customized handcrafted quilt actress shares photo)
हेही वाचा : विचित्र कपड्यांवरून ट्रोल होणाऱ्या उर्फी जावेदचं शिक्षण किती झालं माहितीये का?
रविवारी 6 नोव्हेंबर रोजी आलिया-रणबीरच्या घरी छोट्या आलियाचे आगमन झाले आहे. त्यानंतर कूपर-भट्ट कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. आई आलियाने सोशल मीडियावर ही गोड बातमी दिल्यानंतर त्यांचावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आई-वडील होताच सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षावर सुरु झाला आहे. केवळ चाहत्यांनीच नाही तर सेलिब्रिटींनीही रणबीर आणि आलियाला बाळाच्या आगमनाबद्दल सतत शुभेच्छा दिल्या. या सगळ्यामध्ये आलियानेही आई झाल्यानंतर पहिली पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये आलियाने सांगितले की ते पालक झाले आहेत आणि गोंडस मुलगी आली आहे.