मुंबई : दिग्दर्शक निर्माता करण जोहर बॉलिवूडमध्ये अनेकांचा मित्र त्याचप्रमाणे गॉड फादर देखील आहे. करण त्याच्या हाउस पार्ट्यांसाठी फारच प्रसिद्ध आहे. नुकताच झालेल्या एका पार्टीचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहेत. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. करणने काही दिवसांपूर्वी 'डियर कामरेड' या दाक्षिणात्य चित्रपटाची घोषणा केली .
करणच्या घरात साजरा केलेल्या पार्टीमध्ये दीपिका पादुकोन, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, वरूण धवन गर्लफ्रेंड नताशा दलाल, झोया अख्तर, विकी कौशल, रणबीर कपूर शिवाय अन्य बॉलिवूड सेलेब्रिटी उपस्थित होते.
मलायका-अर्जुन यांनी आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यांच्या न्यूयॉर्कच्या सुट्ट्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. महत्वाचे म्हणजे या पार्टीमध्ये दीपिका-रणबीर एकत्र दिसले. तर या पार्टीमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट उपस्थित नव्हती.