17 मिनिटांच्या रोमांटिक सिक्वन्समुळे उडाली खळबळ; अभिनेत्याचा लिपलॉक सीन आणि...

पहिलीच वेळ होती जेव्हा कोणत्या टीव्ही कलाकारांनी अशाप्रकारे सीन दिला होता.   

Updated: Sep 1, 2021, 11:01 AM IST
17 मिनिटांच्या रोमांटिक सिक्वन्समुळे उडाली खळबळ; अभिनेत्याचा लिपलॉक सीन आणि...  title=

मुंबई : टीव्ही विश्वात पहिल्यांदा  17 मिनिटांचा किसिंग देणारा अभिनेता म्हणजे राम कपूर.  जेव्हा रामने अनपेक्षितरित्या 'बडे अच्छे लगते है' मालिकेत किसिंग सीन दिला तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसला. मालिकेत रामसोबत अभिनेत्री साक्षी तंवरने पत्नीची भूमिका साकारली. राम-साक्षी मधील भाडणं आणि प्रेमाला प्रेक्षकांनी चांगलीचं पसंती दिली. पण 17 मनिटांच्या किसिंग सीनची चर्चा तुफान रंगली. ही पहिलीच वेळ होती जेव्हा कोणत्या टीव्ही कलाकारांनी अशाप्रकारे सीन दिला होता. 

मालिकेतील रोमांटिक सीन एका रात्रीत चर्चेत आला. तर आज रामचा वाढदिवस असल्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. 'बडे अच्छे लगते है' मालिकेत साक्षी-राम ही जोडी टीव्ही विश्वाला भेटली. रामने छोट्या पडद्यावर अनेक अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केली आहे. पण या जोडीला प्रेक्षकांनी देखील डोक्यावर घेतलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

17 मिनिटांच्या त्या रोमांटिक सिनबद्दल राम म्हणतो, 'एक अभिनेता म्हणून तो सीन देताना काही वेगळं वाटलं नाही. त्यामुळे सहजपणे हा सीन करु शकलो....' राम आणि साक्षीच्या भन्नाट केमेस्ट्रीमुळे मालिकेचा टीआरपी देखील उच्च स्थानी होता. 

'बडे अच्छे लगते है' या मालिकेतून अभिनेता राम कपूर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेला. यापूर्वीही विविध मालिकांतून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. टेलिव्हिजन विश्वात सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणूनही रामची ओळख आहे.