मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी म्हणून कुटुंब आणि चाहते प्रार्थना करत आहेत. रोज त्यांच्या आरोग्याबाबत (Raju Srivastava Health update) मोठी अपडेट समोर येत आहे. आता देखील त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती स्थिर आहे, पण कोणताही मोठा बदल झालेला नसल्याची माहिती राजू श्रीवास्तव यांच्या जवळच्या नातेवाईकाने दिली आहे.
रिपोर्टनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या जवळच्या नातेवाईकाने सांगितले की त्यांच्या प्रकृतीत पूर्वीच्या तुलनेत सुधारणा झाली आहे, परंतु ते अद्याप 40 टक्के ऑक्सिजन व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. गेल्या 36 तासांपासून त्यात कोणताही बदल झालेला नाही. याचा अर्थ राजू श्रीवास्तव 60 टक्के ऑक्सिजन नैसर्गिकरित्या घेत आहेत.
राजू यांच्या हलचालीत वाढ झाली असली तरी ते अद्याप शुद्धीवर आलेले नाहीत. राजूच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांना दररोज लिक्विड डाएट दिला जात आहे. त्यांना नळीद्वारे दूध आणि रस दिला जात आहे.
दरम्यान, राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्टला वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी राजू श्रीवास्तव सकाळी जिममध्ये वर्कआऊट करत असताना अचानक बेशुद्ध होऊन ते जमिनीवर पडले.
त्यानंतर राजू यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली होती. मात्र, त्यांना अजूनही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.