मुंबई : हिंदी चित्रपट जगताशी कपूर कुटुंबाचं असणारं नातं सर्वज्ञात आहे. पृथ्वी राज कपूर, त्यांची मुलं राज कपूर, शम्मी आणि शशी कपूर आणि पुढे चालत आलेल्या प्रत्येक पिढीनं चित्रपट जगतात आपआपल्या परिनं योगदान दिलं. फक्त पुरुष मंडळीच नव्हे, तर या कुटुंबातील महिलांनीही कलाजगतात आपलं नशिब आजमावलं. पण, असं म्हणतात ना, घरोघरी त्याच परि... कपूर कुटुंबाच्या बाबतीतही असंच घडलं.
(Raj Kapoor) राज कपूर यांचा सर्वात धाकटा मुलगा, ऋषी आणि रणधीर कपूर यांचा धाकटा भाऊ त्याच्या भावंडांच्या तुलनेच चित्रपटांच्या या विश्वात फारसा यशस्वी ठरला नाही. पण, काही कारणांमुळे मात्र तो सातत्यानं प्रकाशझोतात राहिला. यातलंच एक कारण ठरलं, वडिलांशी असणारा त्याचा वाद.
राज कपूर यांनी 1985 मध्ये 'राम तेरी गंगा मैली' हा चित्रपट साकारला. चित्रपटातून राजीव कपूर अभिनेत्री मंदाकिनीसोबत झळकले. पण, याचा त्यांना फारसा फायदा झाला नाही. आजही हा चित्रपट राज कपूर यांचं दिग्दर्शन आणि मंदाकिनीचे (Mandakini) बोल्ड सीन या ठराविक कारणांनीच हा चित्रपट चर्चेत राहिला. (Rajiv Kapoor had a big fight with father raj kapoor post ram teri ganga maili movie release)
वडिलांच्या या चित्रपटानं आपल्याला फायदा झाला नाही, पण त्यानंतर त्यांनी आपल्यासाठी एक चित्रपट साकारून त्यामाध्यमातून आपल्याला एक मोठा कलाकार होण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा राजीव यांनी बाळगली होती. 'राम तेरी गंगा मैली' नंतर मंदाकिनीला मिळालेलं यश आणि प्रसिद्धी राजीवला सतावू लागली. पण, राज कपूर यांनी मात्र मुलासाठी आणखी एक चित्रपट साकारण्यात रस दाखवला नाही.
इथेच वडील- मुलाच्या नात्यात ठिणगी पडली. नात्यात दुरावा आला. राजीव कायमच राज कपूर यांच्या सहाय्यकाच्या भूमिकेत समोर आले. 'राम तेरी गंगा मैली' नंतर ते 'लवर बॉय', 'अंगारे', 'जलजला', 'शुक्रिया', 'हम तो चले परदेस' अशा चित्रपटांतून झळकले पण, तिथेही त्यांच्या वाट्याला अपयशच आलं.
दिवस पुढे जात होते तसतशी नात्यातील ही दरी आणखी वाढत होती. हे प्रकरण तेव्हा पहिल्यांदा जगासमोर आलं जेव्हा राज कपूर यांच्या निधनानंतरही राजीव कपूर त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले नव्हते. कलाविश्वातील प्रतिष्ठीत कुटुंबात पडलेली ही वादाची ठिणगी इतकी वर्ष धुमसतच राहिली...