33 वर्षांनी अमिताभ आणि रजनीकांत येणार एकत्र; थलायवा पोस्ट शेअर करत म्हणाले 'माझे मेन्टॉर....'

Rajinikanth Working With Amitabh Bachchan after 33 years : रजनीकांत हे लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते दोघं जवळपास 33 वर्षांनी एकत्र दिसणार आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 25, 2023, 06:24 PM IST
33 वर्षांनी अमिताभ आणि रजनीकांत येणार एकत्र; थलायवा पोस्ट शेअर करत म्हणाले 'माझे मेन्टॉर....' title=
(Photo Credit : Social Media)

Rajinikanth Working With Amitabh Bachchan after 33 years : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा काही दिवसांपूर्वी 'जेलर' हा चित्रपट वर्ल्डवाइड प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड केले. या चित्रपटानं 600 कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे. तर आता त्यांच्या चाहत्यांसाठी आणखी एक चित्रपट घेऊनय येत आहे. या चित्रपटाचं नाव 'थलाइवर 170' असं आहे. त्याच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. त्यात सगळ्यांसाठी लक्षवेधी गोष्ट म्हणजे या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत अभिनेता अमिताभ बच्चन हे जवळपास 33 वर्षांनी स्क्रिन शेअर करणार आहेत. त्या निमित्तानं रजनीकांत यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

रजनीकांत यांनी ही पोस्ट त्यांच्या एक्स अकाऊंटवरून केली आहे. याशिवाय त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमिताभ बच्चन यांनी पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट आणि गुलाबी रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. तर रजनीकांत यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. या फोटोत त्या दोघांचं असलेलं बॉन्ड पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत रजनीकांत म्हणाले की "33 वर्षांनंतर मी पुन्हा एकदा माझ्या मेन्टॉर श्री अमिताब बच्चन यांच्यासोबत 'थलाइवर 170' मध्ये काम करणार आहे. लायका प्रोडक्शन असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन टीजे ज्ञानवेल करणार आहेत. मला खूप आनंद झाला असून माझं हृदय धडधडत आहे." या चित्रपटाच्या शूटिंगसाठी रजनीकांत हे मुंबईला पोहोचले आहेत. 

पाहा काय म्हणाले रजनीकांत -

हेही वाचा : कंगना रणौतनं इस्रायलच्या राजदूतांची घेतली भेट, म्हणाली 'आजच्या युगाचे रावण...'

रिपोर्ट्सनुसार, 'थलाइवर 170' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. यात रजनीकांत हे एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर लक्षवेधी गोष्ट अशी आहे की याआधी अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी 1991 मध्ये आलेल्या 'हम', 'अंधा कानून' आणि 'गिरफ्तार' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. रजनीकांत आणि अमिताभ यांच्याशिवाय राणा डग्गुबाती, फहाद फासिलस रितिका सिंह, मंजू वॉरियर आणि दसरा विजयन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर या चित्रपटाला संगीतबद्ध म्युजिक डायरेक्टर अरिरुद्ध रविचंद्र हे करणार आहे. अरिरुद्ध रविचंद्र हे गेल्या काही दिवसांपासून जवान या चित्रपटामुळे चर्चेत होते.