मुंबई : सॉफ्ट पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली आहे. पॉर्न फिल्म बनवण्याच्या आरोपांवरून राजला अटक करण्यात आली आहे. तर यापूर्वी अडल्ट फिल्मसंदर्भात अटकेत आलेली गहना वशिष्ठ हिने राज कुंद्रा प्रकरणावर वक्तव्य केलंय. ती म्हणाली, लोक ज्या प्रकारे पॉर्न फिल्मबद्दल बोलत आहेत, तर कोणतीही पॉर्न फिल्म नाही. हे बोल्ड आणि इरोटिका फिल्म आहेत. जे पॉर्नच्या श्रेणीत येत नाही.
तर आता सोशल मीडियावर देखील इरोटिका आणि पोर्नोग्राफीसंदर्भात चर्चा सुरु आहे. तर जाणून घेऊया यामध्ये नेमका फरक काय आहे.
अमेरिकी फिल्म निर्माता लुसी फिशर यांच्या सांगण्यानुसार, "इरोटिका आमच्यासारख्या चांगल्या मध्यमवर्गीय साक्षर लोकांसाठी आहे, तर पॉर्नोग्राफी एकटे आणि अशिक्षित लोकांसाठी आहे."
डिक्शनरीच्या माहितीप्रमाणे, जी पुस्तकं, मासिकं, फिल्म्स जे कोणतीही लैंगिक कृत्याचं वर्णन किंवा प्रदर्शन अशा प्रकारे केलं जातं जे लैंगिकदृष्ट्या रोमांचक असतं, त्याला Pornographyच्या श्रेणीत ठेवलं जाऊ शकतं. तर दुसरीकडे लैंगिक इच्छा आणि आनंद निर्माण करणारी चित्रं किंवा पुस्तकं ज्यामध्ये पॉर्नोग्राफी नसते, अशांना इरोटिका या श्रेणीत ठेवलं जाऊ शकतं.
लुशी फिशर यांचं वक्तव्य त्या लोकांना आश्चर्यचकित करेल ज्यांना इरोटिका आणि पॉर्नोग्राफी हे वेगळं असल्याचा कधी विचारच केला नाही. इरोटीका हे असं कोणतेही कलात्मक कार्य आहे जे लैंगिक उत्तेजन देणाऱ्या विषयातील प्रकरणाशी संबंधित आहे. जसं की, पेंटींग, शिल्पकला, फोटोग्राफी, नाटक, चित्रपट, संगीत किंवा साहित्य यासह सर्व प्रकारची कला ज्यात कामुक सामग्रीचे वर्णन किंवा प्रदर्शन होतं. इरोटिकाकडून उच्च गुणवत्तेची कला मिळण्याची इच्छा व्यक्त केली आहे, जी व्यावसायिक पोर्नोग्राफीपासून भिन्न आहे.
दुसरीकडे, पोर्नोग्राफीला एक क्रिएटिव एक्टिविटी जसं, लेखन, फिल्म्स, चित्र या रूपांमध्ये दाखवलं जाऊ शकतं. ज्यांना लैंगिक इच्छांना प्रोत्साहित करण्याव्यतिरिक्त साहित्यिक किंवा कलात्मक हेतू नसतो.
शिवाय पोर्नोग्राफी हा प्रामुख्याने पैसे कमावण्याचे उपक्रम आहे जे इरोटिकामध्ये नसतो.