पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राच्या ऑफिसमध्ये छापा; पॉर्न व्हिडीओज, हार्ड डिस्क पोलिसांकडून जप्त

बुधवारी संध्याकाळी राज कुंद्राच्या मुंबईत असलेल्या विआन इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ऑफिस आणि इतर ठिकाणी छापेमारी करण्यात आली. 

Updated: Jul 22, 2021, 11:26 AM IST
पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राच्या ऑफिसमध्ये छापा; पॉर्न व्हिडीओज, हार्ड डिस्क पोलिसांकडून जप्त title=

मुंबई : सॉफ्ट पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली आहे. दरम्यान बुधवारी संध्याकाळी राज कुंद्राच्या मुंबईत असलेल्या विआन इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ऑफिस आणि इतर ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत पोलिसांना काही गोष्टी सापडल्या आहेत. या गोष्टींमुळे राज कुंद्रा याच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा याच्या ऑफिसमध्ये असलेल्या कॉम्प्युटर्सच्या हार्ड डिस्क जप्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे सर्वर देखील सीज करण्यात आला आहे. पोलिसांना या छापेमारीमध्ये पॉर्न व्हिडीयोज मिळाले असून ते देखील जप्त करण्यात आले आहेत. 

Shilpa Shetty पण आहे कंपनीची डिरेक्टर

राज कुंद्राची कंपनी विआन इंडस्ट्रीजचं रजिस्ट्रेशन Retail Trade, Except Of Motor Vehicles And Motorcycles, Repair Of Personal And Household Goods म्हणून करण्यात आलं आहे. विआन इंडस्ट्रीज लिमिटेडटे एकूण 10 एक्टिव्ह डायरेक्टर आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचं देखील नाव आहे.

उमेश कामत देखील राज कुंद्राच्या कंपनीचा डिरेक्टर होता

सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे उमेश कामत देखील विआन इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये डायरेक्टर होता. कंपनीच्या तपशिलानुसार, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात उमेश कामत याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर डिरेक्टर पदावरून त्याचा राजीनामा घेण्यात आला. उमेश कामत ब्रिटनच्या केन्रिन प्रॉडक्शन हाऊसचे भारतीय प्रतिनिधी होते. ज्याद्वारे वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पॉर्न व्हिडिओ अपलोड केले जात होते.

19 जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावलं होतं. ही चौकशी सुमारे 2 तास चालली आणि त्यानंतर राज कुंद्राला रात्री अकरा वाजता अटक करण्यात आली. कोर्टात हजर केल्यानंतर राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.