फवाद खानला 'खुबसुरत' मध्ये सजवणारा 'हा' डिझाईन करणार सोनमच्या पतीचा लूक

अनिल कपूरची कन्या सोनम कपूर येत्या 8 मेला बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. अनिक कपूर यांच्या राहत्या घरी सोनमच्या लग्नाची, संगीत सोहळ्याच्या रिहर्सलची धामधूम सुरू आहे. 

Updated: May 4, 2018, 05:27 PM IST
फवाद खानला  'खुबसुरत' मध्ये सजवणारा 'हा' डिझाईन करणार सोनमच्या पतीचा लूक  title=

 मुंबई : अनिल कपूरची कन्या सोनम कपूर येत्या 8 मेला बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. अनिक कपूर यांच्या राहत्या घरी सोनमच्या लग्नाची, संगीत सोहळ्याच्या रिहर्सलची धामधूम सुरू आहे. 

 राघवेंद्र डिझाईन करणार आनंदचा लूक   

 आनंद अहुजाचे लग्नासाठीचे कपडे डिझाईन करण्याची जबाबदारी डिझायनर राघवेंद्र राठोर यांच्याकडे आली आहे. यापूर्वी राघवेंद्रने फवाद खानसाठी कपडे डिझाईन केले आहेत. राघवेंद्र आता आनंद अहुजासोबतच त्याच्या परिवारातील मंडळींसाठीही ड्रेस डिझाईन करणार आहे.  

आनंद सोबत सोनम होणार विवाहबद्ध 

सोनम कपूर ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. कपूर घरात सिनेक्षेत्राच्या विविध ठिकाणी काम करणारी मंडळी आहेत. आनंद अहुजा मात्र सिनेक्षेत्रापासून दूर काम करणारा आहे. तो दिल्लीस्थित एक बिझनेसमॅन आहे.