Pushpa : डिलीट केलेला सीन मेकर्सने का केला रिलीज? असं काय आहे यामध्ये

पुष्पा सिनेमाची छप्परफाड कमाई

Updated: Jan 3, 2022, 10:41 AM IST
Pushpa : डिलीट केलेला सीन मेकर्सने का केला रिलीज? असं काय आहे यामध्ये  title=

मुंबई : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जून (Allu Arjun)चा पुष्पा हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. कोरोनाचा धोका वाढत असूनही सिनेमा चांगली कमाई करत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच सिनेमाला समिक्षकांनी देखील चांगला दुजोरा दिला आहे. 

'पुष्पा' हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला देखील. सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्यातील काही सिनेमा काढण्यात आले. मात्र आता नवीन वर्षात सिनेमातील काढलेले सीन पुन्हा एकदा जोडण्यात आले. 

नवीन वर्षात सिनेमा मेकर्सने चाहत्यांना आनंदाचा सुखद धक्का दिलाय. सिनेमा दिग्दर्शकाने एक सीन चक्क सोशल मीडियावरही पोस्ट केला आहे. हाच तो सीन आहे जो सिनेमातून डिलिट करण्यात आलं. 

महत्वाची बाब म्हणजे हा सीन हिंदीत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अल्लू अर्जून, रश्मिका मंदाना स्टारर सिनेमा दिग्दर्शक सुकुमार यांनी पुष्पा हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

300 करोड झाली अल्लू अर्जुनच्या सिनेमाची कमाई 

साऊथ स्टार अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदारा यांच्या 'पुष्पा' सिनेमाने बंपर कमाई केली आहे. या सिनेमाला प्रदर्शित होऊन फक्त 2 आठवडे झाले आहेत. 300 करोड रुपये कमाई केली आहे. 

अल्लू अर्जुन-रश्मिका मंदाना स्टारर पॅन इंडिया सिनेमा रिलीज झाला. या मेकर्सने हा सिनेमा देशभर रिलीज झाला होता. या सिनेमाला परदेशातही चांगला रिस्पॉन्स मिळाला.

हिंदी सिनेमाघरात अल्लू अर्जूनच्या सिनेमाने प्रेक्षकांना खेचून आणलं. हिंदी बॉक्स ऑफिसवर सिनेमाने शानदार कमाई देखील केली 56 करोड रुपये कमाई केली.