Pushpa 2 चित्रपटात रश्मिका मंदानाला टक्कर देणार 'ही' टॉपची अभिनेत्री!

जाणून घ्या कोण आहे 'ही' अभिनेत्री...

Updated: Sep 8, 2022, 10:57 AM IST
Pushpa 2  चित्रपटात रश्मिका मंदानाला टक्कर देणार 'ही' टॉपची अभिनेत्री! title=

मुंबई : 'पुष्पा' या चित्रपटाची लोकप्रिय कमी होण्याचं नाव घेत नाही. त्यात आता 'पुष्पा' या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार या बातमीनंतर चाहते आतुर आहेत. आता या चित्रपटाविषयी आणखी मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनं सगळ्यांना चांगलाच आनंद झाला आहे. रश्मिका मंदानासोबत (Rashmika Mandanna) आणखी एक टॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री या चित्रपटात दिसणार आहे. (pushpa 2 update apart from rashmika mandanna this top actress will be cast in movie)

आणखी वाचा : 'त्यांची कहाणी आता...', लेकिच्या तुटलेल्या लग्नावर पहिल्यांदाच बोलले Samantha चे वडील

'पुष्पा 2'साठी रश्मिका मंदानाचं नाव आधीच फायनल झालं आहे. आता आणखी एक टॉलिवूड अभिनेत्री या चित्रपटात सामील झाल्याची बातमी समोर आली आहे. ही सुंदरी दुसरी कोणी नसून तमिळ चित्रपटसृष्टीची स्टार अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) आहे. रिपोर्टनुसार, निर्माता-दिग्दर्शक सुकुमार यांनी साई पल्लवीशी या चित्रपटाविषयी बोलणं केलं आहे आणि ती या चित्रपटात एक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिपोर्टनुसार, या चित्रपटात साई एका आदिवासी महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. माहिती अशी आहे की, साईला ही भूमिका खूप आवडली असून तिनं निर्मात्यांना होकार दिला आहे. निर्माते किंवा साई यांनी अद्याप या बातमीला दुजोरा दिलेला नाही. साई पल्लवीचे लाखो चाहते आहेत, अशा परिस्थितीत ही बातमी जाणून घेण्यासाठी चाहते अधिक उत्सुक झाले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिपोर्टनुसार, 1 सप्टेंबरपासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे, हे जाणून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. त्याचबरोबर अशीही बातमी आहे की अल्लू अर्जुन (Allu Arjun) सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सध्या तरी निर्मात्यांनी याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही, पण जर ही बातमी खरी असेल तर ही बातमी चाहत्यांसाठी आनंदाची आहे. निर्मात्यांनी पहिल्या भागावर 194 कोटी रुपये खर्च केले होते, यावेळी ते सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या मूडमध्ये आहेत. त्याचबरोबर अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबत फहद फासिल (Fahadh Faasil) देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.