Pushpa 2 मधील कलाकारांच्या बसचा अपघात, शुटिंगहून परतताना बसला धडक

Pushpa 2 Actors Bus Accident: 'पुष्पा 2' हा चित्रपट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे शुटिंग सध्या सुरू असल्याचे कळते आहे. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार सध्या या चित्रपटातील कलाकारांच्या बसचा अपघात झालाा असून त्यांच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Pushpa 2 मधील कलाकारांच्या बसचा अपघात, शुटिंगहून परतताना बसला धडक title=
फाईल फोटो

Pushpa 2 Actors Bus Accident: सध्या शुटिंगवर होणाऱ्या अपघांतांचे प्रमाण वाढू लागले आहे. काही दिवसांपुर्वी सलमान खान सेटवर जखमी झाला होता. आता समोर आलेल्या माहितीनुसार, 'पुष्पा 2' च्या शुटिंग दरम्यान कलाकारांच्या बसला अपघात झाला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या अभिनयानं गाजलेल्या 'पुष्पा' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये अजूनही चर्चा होताना दिसते. या चित्रपटाला आलेल्या प्रतिसादामुळे आता या चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजेच 'पुष्पा 2' हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे या चित्रपटाचीही प्रेक्षकांना आतूरता लागून राहिली आहे. 

या चित्रपटाचे शुटिंग सध्या सुरू आहे तेव्हा या चित्रपटातील कलाकारांच्या बसला अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. या अपघातात कलाकारही जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, 'पुष्पा 2' चित्रपटाचे शुटिंग संपवून आंध्र प्रदेशातील श्रीकााकुलम जिल्ह्यातून हे सर्व कलाकार हैद्राबादला परतत होते. तेव्हा त्या दरम्यान त्यांच्या बसला अपघात झाला. तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात हा अपघात झाल्याचे कळते आहे. यांच्या बसनं हैद्राबाद - विजयवाडा महामार्गावर नरकटपल्लीजवळ थांबलेल्या आरटीसी बसला धडक दिली. या अपघातात दोन कालाकार हे किरकोळ जखमी झाले असून कुणालाही गंभीर दुखापत झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही. 

हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या या दोन्ही कलाकारांवर स्थानिक रूग्णालायात उपचार सुरू आहे. काही दिवसांपुर्वी अशाच एका दाक्षिणात्त्य चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान एक अपघात झाला होता. 'पुष्पा' या चित्रपटाची पहिली झलकही प्रेक्षकांच्या समोर आली आहे. आणि सोबतच अल्लू अर्जूननं आपला या चित्रपटातील नवा लुकही इन्टाग्रामवरून मागील महिन्यात शेअर केला होता. त्याच्या या पोस्टला आत्तापर्यंत 60 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. त्याच्या या लुकची बरीच चर्चाही रंगली आहे. 

हेही वाचा - अपघात की षडयंत्र? अंगावर शहारे आणणारा Godhra चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

काल अल्लू अर्जूनच्या भावाचा म्हणेजच अल्लू शिरीषचा वाढदिवस होता. या निमित्तानं त्यानं आपल्या लाडक्या भावाला शुभेच्छा दिल्या. सध्या दाक्षिणत्त्या चित्रपटांची बरीच क्रेझ रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे आता बॉलिवूडपेक्षा प्रेक्षक प्रादेषिक चित्रपटांना जास्त महत्त्व देताना दिसत आहेत. त्यामुळे असे सिनेमे परत परत पाहण्यासाठीही प्रेक्षक आतूर आहेत. रश्मिका मंदान्नाही आता बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये रमलेली दिसते आहे. तिची आता या नव्या चित्रपटात काय भुमिका आहे याबद्दलही प्रेक्षक उत्सुक आहेत.