निक जोनास गे ? पतीबद्दलचा हा गौप्यस्फोट ऐकून प्रियांकाही हादरेल

कोणी केला हा मोठा खुलासा?   

Updated: Aug 22, 2022, 01:23 PM IST
निक जोनास गे ? पतीबद्दलचा हा गौप्यस्फोट ऐकून प्रियांकाही हादरेल  title=
priyanka chopra will be shocked as ex girlfriends claim nick jonas is gay

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांचा चोप्रा  (Priyanka Chopra) आणि तिचा पती, अमेरिकन गायक निक जोनस (Nick Jonas) हे दोघंही सध्या त्यांच्या लेकिमध्ये चांगलेच रमले आहेत. या नव्या पाहुणीच्या येण्यानं सेलिब्रिटी जोडीचं नातं खऱ्या अर्थानं पूर्णत्वास गेलं. पण, आता मात्र या नात्याचा पाया डगमगू शकतो अशा चर्चा आहेत.  

कारण, ठरतंय ती म्हणजे निकची एक्स गर्लफ्रेंड सलेना गोमेज (Selena Gomez). सध्या सेलेनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 2018 मधील तिच्या एका मुलाखतीचा असल्याची माहिती समोर येत आहे. 

एका कार्यक्रमादरम्यान, निक जोनासला 1 ते 10 मध्ये गुण द्यायचे झाल्यास तो किती गे आहे? असा प्रश्न तिला एंडी कोहेननं केला. या प्रश्नाचं उत्तर देत Anchor नं निकला गे असण्याबद्दल 10 गुण दिले.

वाचा : टॉक शो, की सेलिब्रिटींच्या Dirty Secrets चा खुलासा करणारं व्यासपीठ? Kjo चा  Video पाहून अनेकांनाच प्रश्न 

सेलेनानं मात्र, 'मी त्याला डेट केलंय... 0 गुण' असं वक्तव्य करत सर्वांच्याच नजरा वळवल्या. निकबद्दलच्या या वक्तव्यानं प्रियांकालाही हादरा बसू शकतो. 

दरम्यान, निक आणि सेलेना 2008 मध्ये रिलेशनशिपमध्ये होते. तिच्याआधी निकनं मायली सायरसला डेट केलं होतं. 2011 मध्ये तो ऑस्ट्रेलियन गायिका डेल्टा गूड्रेमसोबत वर्षभर रिलेशनशिपमध्ये होता. 2013 मध्ये त्याच्या आयुष्यात फॅशन इन्फ्लूएंसर ओलिविया कल्पो आली. पण, 2015 मध्ये मात्र त्यांचं ब्रेकअप झालं. पुढे 2018 मध्ये निकच्या आयुष्यात प्रियांका आली आणि या जोडीनं त्यांच्या नात्याला एक नवी ओळख देत लग्नाचा निर्णय घेतला.