टॉक शो, की सेलिब्रिटींच्या Dirty Secrets चा खुलासा करणारं व्यासपीठ? Kjo चा Video पाहून अनेकांनाच प्रश्न

Video तुफान व्हायरल 

Updated: Aug 22, 2022, 12:56 PM IST
टॉक शो, की सेलिब्रिटींच्या Dirty Secrets चा खुलासा करणारं व्यासपीठ? Kjo चा  Video पाहून अनेकांनाच प्रश्न  title=
Karan johar Koffee With Karan 7 kiara Advani shahid kapoor new episode promo

मुंबई : कॉफी विथ करण 7 (Koffee With Karan 7) या कार्यक्रमात एखादा सेलिब्रिटी आला, की बरीच गुपितं समोर येणार हे आता एक अलिखित समीकरणच झालं आहे. सेलिब्रिटींच्या रिलेशनशिप्सपासून ते अगदी त्यांच्या Sexual Life बद्दलही या टॉक शोमध्ये बरीच चर्चा केली जाते. 

अभिनेता शाहिद कपूर आणि किआरा अडवाणी या कार्यक्रमासाठी आले (kiara Advani shahid kapoor ), तेव्हासुद्धा याचीच पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी तिनं अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबतच्या आपल्या नात्यावरही वक्तव्य केलं. पण, त्याआधी शाहिदनं कहर केला. 

तुझं ‘sexiest feature’ सांग, असं करणनं वचारताच शाहिदनं जे उत्तर दिलं ते ऐकून करणच्याही भुवया उंचावल्या. '...ते आता कॅमेराला दिसत नाहीये' अशा शब्दांत शाहिदनं त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि बस्स... हा व्हिडीओ व्हायरल होण्यास सुरुवात झाली. 

गप्पांच्या ओघात किआरानं आपण सिद्धार्थसोबतचं नातं स्वीकारतही नाही आणि नाकारतही नाही, असं स्पष्ट केलं. शिवाय आपण खास मित्रांहूनही चांगल्या नात्यात असल्याचं सांगत तिनं चर्चांना नव्यानं वाव दिला. 

किआरा आणि सिद्धार्थच्या नात्याकडे लक्ष वेधताना, या वर्षअखेरीस मोठी बातमी कानावर पडेल असं म्हणत शाहिदनं या जोडीच्या लग्नाकडे लक्ष वेधलं. तिथे कलाकारांची गुपितं समोर येत असतानाच करणच्या या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात किमान दोन प्रश्न तरीह सेलिब्रिटींच्या Sex Life शी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या संबिधित असतात. 

परिणामी कार्यक्रमाचे प्रोमो पाहिल्यानंतर हा टॉक शो आहे, की सेलिब्रिटींच्या Dirty Secrets चा खुलासा करणारं व्यासपीठ?  असाच प्रश्न काहीजण उपस्थित करताना दिसत आहेत.