''तुम्ही तुमच्या मुलाला...'' Priyanka Chopra ची पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय, सासूबाईंचा उल्लेख करत म्हणाली...

Priyanka Chopra Mother's Day Post: आज मदर्स डेच्या निमित्तानं आज बॉलिवूड सेलिब्रेटीही आपल्या आईला खास शुभेच्छा देताना (Priyanka Chopra News) दिसत आहेत. यावेळी अभिनेत्री प्रियांका चोप्रानंही आपल्या आईला, मुलीला आणि सासूबाईंना खास शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या तिची पोस्ट चाहत्यांचे (Fans) लक्ष वेधून घेते आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 14, 2023, 08:11 PM IST
 ''तुम्ही तुमच्या मुलाला...'' Priyanka Chopra ची पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय, सासूबाईंचा उल्लेख करत म्हणाली... title=
फाईल फोटो

Priyanka Chopra Mother's Day Post: प्रियांका चोप्रा आपल्या बहिणीच्या परिणीती चोप्राच्या साखरपुड्यासाठी दिल्लीत दाखल झाली होती. यावेळी तिनं सुंदर असा डार्क पिस्ता कलरचा शरारा कम ड्रेस घातला होता. ती या आऊटफिटमध्ये खूपच खुलून दिसत होती. यावेळी तिनं सोहळा संपन्न झाल्यानंतर माध्यमांसमोर(Priyanka Chopra at Parineeti Chopra Engagement) येत एक पोझही दिली. यावेळी तिनं नमस्कार करून मिडियासमोर पोझ दिली. सध्या परिणीती चोप्राच्या साखरपुड्याचे फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

परंतु आज मदर्स डे असल्याने सेलिब्रेटी आपल्या आईसह फोटो आणि पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. यावेळी प्रियांका चोप्राची (Priyanka Chopra News) पोस्टही सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते आहेत. (priyanka chopra shares an emotional post on mothers day for mother madhu chopra and mother in law denise jonas)

काय आहे पोस्ट? 

आज मदर्स डेच्या निमित्तानं प्रियांकानं मुलगी मालती (Priyanka Chopra Denise Jonas), आई मधु चोप्रा आणि सासूबाई डेनिस जोनास यांचे फोटो शेअर करत त्यांना इन्टाग्रामवरून खास शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी पोस्ट शेअर करत तिनं लिहिले आहे की, ''प्रिय आई, मी खरचं खूप भाग्यवान आहे म्हणून मला कायमच तुमचे प्रेम मिळाले आहे. माझी आई ही सर्वात सामर्थ्यवान महिला आहे आणि तिची आईही तितकीच सामर्थ्यवान होती. मी अशाच महिलांच्या वावरात वाढले आहे ज्या अत्यंत बलवान आणि कणखर आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की मी अशा महिलांच्या सानिध्यात वाढले आहे. माझी आई, काकू, आजी या अशाच होत्या. धन्यवाद आई, तू मला मिळालेली एक अमूल्य भेटवस्त आहेच. 

हेही वाचा - Papon: 13 वर्षांच्या मुलानं संपूर्ण रात्र हॉस्पिटलमध्ये घालवली, रूग्णालयात दाखल झाल्यानंतर प्रसिद्ध गायकाची भावूक पोस्ट

त्या सर्वांसोबत, ज्यांनी मी ओळत होते आणि नव्हते. ज्यांना मला जाणून घेता आले. आता मी आई झाले आहे तेव्हा मलाही त्याबद्दल फार चांगले वाटते आहे. आईचं प्रेम आता मला पुढे घेऊन जायचे आहे.'', अशी पोस्ट करताना प्रियांका आपल्या सासूबाईंचा नावासह उल्लेख केला आहे आणि आपली मुलगी मालती मेरी हिला आशीर्वीद दिले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रियांकाची जगभर हवा

प्रियांकाच्या या पोस्टवर बॉलिवूडमधील अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. सध्या प्रियांका चोप्रा हिची 'सिटाडेल' ही वेबसिरिज सध्या जगभरात फेमस झाली आहे. काही वेळाच या सिरिजला प्रेक्षकांचा चांगली प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे सध्या ही सिरिज जगभर गाजते आहे. प्रियांका आता हिंदी चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. झोया अख्तरच्या 'जी ले जारा' या चित्रपटातून अभिनेत्री आलिया भट्ट, कतरिना कैफ आणि प्रियांका एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे.