'भारत मरत आहे,आणि तू...' बोल्ड फोटो पोस्ट करताचं प्रियंका चोप्रा ट्रोल

प्रियंका कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. 

Updated: May 11, 2021, 02:54 PM IST
'भारत मरत आहे,आणि तू...' बोल्ड फोटो पोस्ट करताचं प्रियंका चोप्रा ट्रोल title=

मुंबई : बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपल्या नावाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा कायम चर्चेत असेत. प्रियंका कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता एका वेगळ्या कारणामुळे प्रियंका चर्चेत आली आहे, पण रंगणाऱ्या चर्चेमुळे तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागत आहे. सध्या भारतात कोरोना व्हायरसने  भयंकर रूप घेतलं आहे. भारतात रूग्णसंख्ये सोबतचं मृत्यूचा आकडा देखील वाढत आहे. या महामारीमध्ये भारताला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. 

अशा महामारीच्या परिस्थितीत प्रियंकाने मात्र सोशल मीडियावर बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. बोल्ड फोटो पोस्ट केल्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे. 'येथे भारत मरत आहे, आणि तू फोटो पोस्ट करत आहेस...' असं म्हणत नेटकऱ्यांनी प्रियंकावर निशाणा साधला आहे.  काही दिवसांपूर्वी प्रियंकाने देखील भारताबद्दल काळजी व्यक्त केली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra)

एक व्हिडिओ पोस्ट करत प्रियंका म्हणाली होती,  'मी सध्या लंडंनमध्ये आहे. भारताची परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. मी माझ्या कुटुंबाकडून आणि मित्र परिवाराकडून ऐकत आहे. रूग्णालयात बेड्स नाहीत, आयसीयू रूम्स नाही, एकत्र मृतदेहांना अग्नी देण्यात येत आहे.'

ती पुढे म्हणाली, आपल्याला जागतिक स्तरावर चिंता करण्याची गरज आहे. जोपर्यंत देशातील प्रत्येक नारगिक सुरक्षित नाही, तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. त्यामुळे मदत करा. मदतीसाठी पुढे या. सध्याच्या परिस्थितीत भारताला आपल्या सर्वांची गरज आहे. 

पण आता बोल्ड फोटो पोस्ट केल्यामुळे प्रियंका नेटकऱ्यांच्या जाळ्यात सापडली आहे. फोटोमध्ये प्रियंकाने सफेद रंगाचा ड्रेस घातला आहे. प्रियंका कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. शिवाय फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत ती कायम चाहत्यांच्या संपर्कात असते.