नवी दिल्ली : सलमान खानचा 'भारत' सिनेमा सोडल्यानंतर प्रियांका चोप्रा आता नवा सिनेमा साईन करतेय. प्रियांकाने फरखान अख्तरसोबतचा 'द स्काय इज पिंक' सिनेमा साईन केल्याची जोरदार चर्चा आहे. याची शुटींग ८ ऑगस्टपासून मुंबईमध्ये सुरू होणार असल्याचे वृत्त 'डेक्कन क्रॉनिकल' ने दिलंय. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात प्रियांका 'भारत' ची शुटींग करणार होती. प्रियांका एकाचवेळी दोन्ही सिनेमाचे शुटींग करणार असल्याचे म्हटले जात होते पण आता तिने 'भारत' सिनेमा सोडल्यावर शिक्कामोर्तब झालंय.
प्रियांकाने अली अब्बास जफरचा 'भारत' सिनेमा सोडण्याचे लग्न हे कारण नव्हते असेही एका सुत्राने सांगितले. कदाचित 'भारत' मध्ये प्रियांकाचे कॅरेक्टर जास्त मोठं नव्हतं हे कारण असल्याची चर्चा आहे. तसंही 'द स्काय इज पिंक' मध्ये तिला लीड रोल मिळल्याचेही सांगितलं जातंय. 'भारत'मधून प्रियांकाने बॅकआऊट केल्यानंतर कॅटरीना कैफ किंवा जॅकलीन ही जागा घेणार असल्याचे कळते. निर्माचे अनुष्का शर्माच्या नावाचाही विचार करत असल्याचे म्हटलं जातंय.
भारतातील निर्मात्यांनी प्रियांकावर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केलीयं. भारत सिनेमातून प्रियांकाने बॅकआऊट केल्याचे काही दिवसांपुर्वीच समजले होते. सलमानचे भावोजी अतुल अग्नहोत्रींची कंपनी रील लाइफ प्रोडक्शन हा सिनेमा करणार आहे. या सिनेमाचे सीईओ निखिल निमित यांनीही प्रियांकावरची नाराजी व्यक्त केली.