प्रथमेश व्यवसायात मुग्धा देणार साथ; गुढीपाडव्याच्या मुर्हूतावर करणार नवी सुरुवात!

Prathmesh Laghate and Mugdha Vaishampayan Business :  प्रथमेश लघाटेच्या व्यवसायात पत्नी मुग्धा वैशंपायनची साथ... 

दिक्षा पाटील | Updated: Apr 2, 2024, 01:24 PM IST
प्रथमेश व्यवसायात मुग्धा देणार साथ; गुढीपाडव्याच्या मुर्हूतावर करणार नवी सुरुवात! title=
(Photo Credit : Social Media)

Prathmesh Laghate and Mugdha Vaishampayan Mango Business : आजकाल आपल्याला अनेक लोक हे छोटा-मोठा का होईना पण व्यवसाय करताना दिसतात. त्यात उन्हाळा सुरु झाला की कोकणात राहणारे अनेक लोक हे त्यांचा व्यवसाय करतात. त्याचं कारण आणखी एक आहे आणि ते म्हणजे सगळ्यांची आंब्याची आवड. सगळ्यांनाच आंबा खायाला आवडतं. या व्यवसायात मराठमोळे लोकप्रिय गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी देखील एन्ट्री केली आहे. खरंतर ही मुग्धाची एन्ट्री असू शकते कारण प्रथमेश हा मुळचा रत्नागिरीचा आहे. त्याचं कुटुंब दरवर्षी आंब्याच्या सीझनमध्ये हा बिझनेस करतात. प्रथमेश लघाटेनं याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. 

प्रथमेश आणि मुग्धानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रथमेशनं एक पोस्टर शेअर केलं आहे. त्यात 'लघाटे आंबेवाले आणि कोकणी उत्पादनं... गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुम्हासर्वांसाठी यावर्षीही घेऊन येत आहेत अस्सल रत्नागिरी हापूस... त्याशिवाय त्यांनी ऑर्डर फक्त व्हॉटसअॅपवर घेण्यात येतील' हे देखील सांगितलं आहे. तर ही पोस्ट शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं की "नमस्कार! 2024 च्या आंबाच्या सीझनमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत, आंबाप्रेमींच्या सेवेत पुन्हा रुजू होत आहोत आत्तापासून. तीच चव, अव्वल दर्जा, तसाच गोडवा. गुढीपाडव्यासाठी लघाटे आंबेवाले यांच्याकडे आपली ऑर्डर त्वरित बुक करा आणि नववर्षाच्या स्वागताची दिमाखदार परंपरा अबाधित ठेवा."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, प्रथमेशची ही पोस्ट पाहता त्यांच्या चाहत्यांनी त्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, "दर इथे विचारू नका प्रत्यक्ष जा 2 आंबे खा त्यांनी आपल्याला लग्नाला बोलवले नाही म्हणून एका पेटीवर एक पेटी फ्रि पेनल्टी देणार असेल तरच पेटी घ्या!!" तर त्या नेटकऱ्याच्या कमेंटवर प्रथमेशनं प्रतिक्रिया दिली आहे. प्रथमेश म्हणाला की 'काका.. खूपच विनोदी आहात हो तुम्ही...' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मराठी माणूस व्यवसाय करतोय यापेक्षा मोठी गोष्ट नाही ..खूप शुभेच्छा' तिसरा नेटकरी म्हणाला, 'आपल्या लोकांनी व्यवसाय केला की बर वाटत'. तर काही नेटकऱ्यांनी त्यांना परदेशात आंबे हवे आहेत तिथे पाठवला का असे प्रश्न देखील विचारले आहेत. याचाच अर्थ आंब्याची क्रेझ ही पाहायला मिळत आहे. इतकंच नाही त्यांच्या आंब्यांची किती मागणी आहे हे देखील आपल्याला कळतंय. 

हेही वाचा : हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर संतापला अभिनेता पुष्कर जोग! Insta स्टोरी पोस्ट करत म्हणाला, 'आता हे खूप...

प्रथमेश आणि मुग्धाविषयी बोलायचे झाले तर ते दोघं गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये या जोडप्याने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.