हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर संतापला अभिनेता पुष्कर जोग! Insta स्टोरी पोस्ट करत म्हणाला, 'आता हे खूप...

Pushkar Jog on IPL 2024 Hardhik Pandya : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 2, 2024, 12:54 PM IST
हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर संतापला अभिनेता पुष्कर जोग! Insta स्टोरी पोस्ट करत म्हणाला, 'आता हे खूप... title=
(Photo Credit : Social Media)

Pushkar Jog on IPL 2024 Hardhik Pandya : संपूर्ण देशात आयपीएल (इंडियन प्रिमिअर लीग 2024) ला घेऊन चर्चा सुरु आहे. त्याचा 14 व्या सामना नुकताच झाला. हा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये झाला. अशात राजस्थान रॉयल्सच्या संघाने 27 बॉल आणि 6 विकेट्स राखून मुंबई इंडियन्सच्या संघाला पराभूत केले. या पराभवानंतर मुंबई इंडियन्स पॉइन्ट टेबलमध्ये सगळ्यात खाली गेली आहे. दरम्यान, या सगळ्यात एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो. या व्हिडीओत वानखेडेमध्ये मॅच पाहण्यासाठी पोहोचलेले प्रेक्षक हार्दिक पांड्याचं नाव घेताच त्यांनी टाळ्या वाजवत त्याचे स्वागत करण्या ऐवजी हुर्यो उडवली. हे पाहता त्यावर लोकप्रिय मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

पुष्करनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केलेल्या व्हिडीओत पाहायला मिळते की  अॅंकर आणि माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर ही टॉस करण्याच्यावेळी दोन्ही टीमच्या कॅप्टनंचं नाव घेत होते. त्यावेळी त्यांनी सुरुवात ही मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्यापासून केली. ते म्हणाले की मुंबई इंडिन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याचे टाळ्या वाजवून स्वागत करा. तर प्रेक्षकांनी असं न करता त्याची हुर्यो उडवण्यास सुरुवात केली. त्यावेळी हार्दिक पांड्यानं काही प्रतिक्रिया दिली नाही तो फक्त शांत उभा होता. तर दुसरीकडे संजय मांजरेकरांना हे पटन नाही त्यांनी लगेच प्रेक्षकांना असं करणं चुकीचं आहे असं थोडक्यात सांगत 'Behave' हा शब्दोपचार केला. तर त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पाहा काय म्हणाला पुष्कर जोग

हा व्हिडीओ पाहताच पुष्करनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत पुष्करनं कॅप्शन दिलं की "हार्दिकसोबत जे काही होतं आहे. मित्रांनो, ते योग्य नाही... आता हे खूप जास्त होतंय. हार्दिक हा भारताचे प्रतिनिधीत्व करतो आणि त्याशिवाय आपल्या देशासाठी अनेक सामने जिंकवून देत त्यानं आपल्याला खूप आनंदी केलं. रोहितचे चाहते असणं ही एक चांगली गोष्ट आहे पण कोणताही भारतीय क्रिकेटपटूला अशा हुर्योची किंवा वागणूक मिळणं हे चूकीचं आहे. हार्दिक पांड्यानं जे केलं ते पूर्ण योग्य नसेल. त्यावरून आपल्याच भारतीय क्रिकेट टीमचा अपमान करणं हे चुकीचं आहे."

marathi actor pushkar jog got angry on fans who were booing on hardik pandya in ILP

हेही वाचा : करिश्मा-रवीनाशी जोडलं नाव, पहिला चित्रपट झाला हिट... आज बॉलिवूडवर राज्य करतोय 'हा' मुलगा

दरम्यान, फक्त पुष्कर नाही तर पुष्करसोबत अनेक सेलिब्रिटी आणि खेळाडूंनी हार्दिकला पाठिंबा दिला आहे. त्यांचं म्हणणं आहे की काहीही झालं तरी हार्दिकसोबत जे काही होतं आहे, ते योग्य नाही फार चूकीचं आहे.