नवी दिल्ली : बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत ही सतत काही ना काही कारणास्तव चर्चेत असते. मात्र पार्टीज, पुरस्कार सोहळ्यांमध्ये ती क्वचितच दिसून येते. सध्या राजकारणावर बोलल्याबद्दल ती चर्चेत आहे.
अलिकडेच कंगणा न्यूज १८ च्या रायजिंग इंडिया समिटमध्ये सहभागी झाली होती. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचे हे काही खास फोटोज...
यावेळी सेंसर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशींनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. कंगणा मोदींची चाहती असल्याने त्यांच्या भेटीचा आनंद कंगणाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. साडीत कंगणा अत्यंत सुंदर दिसत आहेत.
There is so much power, wit & flair in these pics! When #KanganaRanaut met Hon'ble @PMOIndia Shri @narendramodi & #CBFC Chairman & prolific songwriter @prasoonjoshi_ #Bollywood #Koimoi pic.twitter.com/u2jJJiIuzS
— Koimoi.com (@Koimoi) March 20, 2018
एका मुलाखतीत कंगणा म्हणाली की, मी ज्याप्रकारचे कपडे घातले किंवा बोलते. त्यावरुन कोणत्या पार्टीत किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये मला सहभागी करुन घेतले जाईल असे वाटत नाही. पण माझा फॅशन सेन्स न बदलता आणि माझ्या मनाप्रमाणे बोलण्याची मुभा दिल्यास राजकारणात जाण्यास काही हरकत नाही.
या कार्यक्रमादरम्यान कंगना बोलली की, मी देशाची नागरिक असल्याने माझी स्वतःची प्रगती देशाच्या विकासाशी संबंधित आहे. माझा धर्मावर विश्वास नाही. मी फक्त स्वतःला भारतीय मानते. मी भारतीय आहे आणि माझा जन्म भारतात झाला आहे. याशिवाय माझी कोणतीही ओळख नाही.
सध्या कंगणा मणिकर्णिका सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर मेंटल है क्या या सिनेमात ती राजकुमार सोबत झळकणार आहे.