या अभिनेत्याला पाहून लहान मुलं आईच्या साडीत भीतीने तोंड लपवून विचारायचे, "आई तो...

प्राण यांना सिगारेटची फार आवड होती.

Updated: May 18, 2021, 12:04 PM IST
 या अभिनेत्याला पाहून लहान मुलं आईच्या साडीत भीतीने तोंड लपवून विचारायचे,  "आई तो... title=

मुंबई : प्राण यांना सिगारेटची फार आवड होती. प्राण यांनी वयाच्या 12व्या वर्षापासूनच सिगारेट ओढण्यास सुरुवात केली होती. याच कारणामुळे शहरातील अनेक पान दुकानात त्यांची ओळख झाली. दुकानदार प्राण यांचा चेहरा पाहताच त्याच्या ब्रँडची सिगारेट काढत असत. एके दिवशी जेव्हा ते पानच्या दुकानात सिगारेट ओढण्यासाठी गेले, तेव्हा त्याला स्क्रिप्ट लेखक वली मोहम्मद वाली सापडले. वली मोहम्मद यांनी त्यांना पाहिलं, नंतर काळजीपूर्वक वली मोहम्मद यांनी एका छोट्या कागदावर आपला पत्ता लिहून प्राण यांना दिला आणि भेटायला सांगितलं. पण प्राण साहेबांनी वली महंमद यांनी दिलेल्या त्या कागदाच्या तुकड्यावर लक्ष दिलं नाही.

काही दिवसानंतर, जेव्हा वली मोहम्मद प्राणला टक्करले, तेव्हा त्यांनी प्राण यांना पुन्हा आठवण करून दिली. अखेर प्राण साहेबांनी चिडून विचारलं की, तुम्हाला मला का भेटायचं आहे? त्याला उत्तर म्हणून वली मोहम्मद यांनी त्यांना फिल्मीस्टाईलने उत्तर दिलं.

विशेष म्हणजे त्यावेळीही प्राण यांनी त्यांचे शब्द फारसे गांभीर्याने घेतले नाहीत, तर त्यांनी भेटण्याची तयारी दर्शविली. अखेरीस, वली मोहम्मद यांनी प्राणला भेटल्यावर त्यांची समजूत घातली. अशाप्रकारे, प्राण पंजाबीमध्ये बनवलेल्या त्याच्या कारकिर्दीचा पहिला चित्रपट यमला जाट मध्ये दिसले. म्हणूनच प्राणसाहेब वाली मोहम्मद यांना आपला गुरू मानत.

प्राण यांचे शिक्षण कपूरथला, उन्नाव, मेरठ, देहरादून या शहरांत झालं. त्याचे वडील रस्ते आणि पूल तयार करायचे. असं म्हटलं जातं की, देहरादून शहरातील लला हा कालसी पूल फक्त कृष्णा सिकंद यांनी बांधला होता. १९४५ मध्ये प्राण यांनी शुक्ला अहलुवालियाशी लग्न केलं. त्यांना दोन मुलं, अरविंद आणि सुनील तसेच एक मुलगी पिंकी आहे.

रस्त्यावर लोक द्यायचे शिव्या
प्राण अभिनयामध्ये उत्कृष्ट होते, प्राण यांनी गाजवलेल्या खलनायकाच्या भूमिकेमुळे लोक त्यांना रस्त्यावर शिवीगाळ करायचेत. एकेकाळी लोकांनी आपल्या मुलांची नाव प्राण ठेवणही बंद केलं. प्राण यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं की, 'उपकार' पाहिल्यानंतर लोकांना मी रस्त्यावर दिसलो की म्हणायचे 'हे बदमाश', 'ओ लाफंगे', 'हे गुंड' असं म्हणायचे.

मी जेव्हा तावतावात पडद्यावर यायचो, तेव्हा मुलं आईच्या मांडीवर लपून आईच्या साडीत तोंड लपवायचे. मुलं विचारायची, "आई गेला का तो, आता मी माझे डोळे उघडू शकतो काय?" प्राण यांचा जन्म १२ फेब्रुवारी 1920 रोजी दिल्ली येथे झाला. लाला केवल कृष्णा सिंकद सरकारी ठेकेदार यांच्या घरी झाला तर १२ जुलै 2013 मध्ये या जगाचा निरोप घेतला. त्यांनी एकापेक्षा एक ४०० हून अधिक चित्रपटांत काम केलं.