Prajakta Mali Want To Marry Salman Khan : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही नेहमीच चर्चेत राहणारी आहे. प्राजक्ता गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत होती. या वक्तव्यात प्राजक्तानं वैभव तत्ववादी हा तिचा क्रश होता असं सांगितलं होतं. दरम्यान, आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्तानं तिला बॉलिवूडचा भाईजान सलमान खानशी (Salman Khan) लग्न करायचे असल्याचे सांगितले.
प्राजक्तानं नुकतीच एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. त्यावेळी प्राजक्तानं 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत तिला सलमान खान खूप आवडतो असा खुलासा केला होता. तर पुढे प्राजक्तानं हा खुलासा केला की बॉलिवूडमधील तिचा पहिला सेलिब्रिटी क्रश कोणी असेल तर तो सलमान खान आहे.
तिच्या क्रश विषयी बोलताना प्राजक्ता म्हणाली, 'मला सलमान खान आवडायचा. मी अगदीच लहान होते…म्हणजेच दोन-तीन वर्षांची असेन. माझ्या आतेभावाचा तो आवडता हिरो होता. त्याने मला शिकवलं होतं आणि मी म्हणायचे की मला सलमान खानशी लग्न करायचं.' हे बोलत असताना प्राजक्तालाही तिचे जुने दिवस आठवले आणि ती हसू लागली. तिच्या या वक्तव्यानं सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे.
हेही वाचा : 'माझ्या नवऱ्याला...', Shreya Bugde चा मोठा खुलासा VIDEO व्हायरल
दरम्यान, या आधी प्राजक्ता माळीनं दुसऱ्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की तिला वैभव तत्ववादी आवडायचा. तर तिनं त्याच्याशी लग्न करण्याविषयी तिच्या आईलाही विचारले होते. तिला सगळ्यात आधी वैभव हा 'कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटामुळे आवडू लागला होता. तेव्हाच तो तिचा क्रश झाला. त्यानंतर त्या दोघांनी एका चित्रपटात काम केलं आणि ते दोघे चांगले मित्र झाले. तर यावर वैभवनं देखील त्याची प्रतिक्रिया दिली होती की मला प्राजक्ताने स्वत: मुलाखतीतील तो व्हिडीओ पाठवला होता. मी तुझ्याबद्दल असं बोलली आहे, हे तिने मला सांगितलं. एका सुंदर मुलीने क्रश असल्याचं सांगितल्यावर एका मुलाच्या ज्या भावना असतील. त्याच माझ्या होत्या.'
प्राजक्ता विषयी बोलायचे झाले तर ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्राजक्ताचे इन्स्टाग्रामवर 1.9 मिलीयन फॉलोवर्स आहेत. तर काही दिवसांपूर्वी तिनं तिची एक ज्वेलरी साईट सुरु केली असून प्राजक्ता राज असे त्याचे नाव आहे. त्याशिवाय प्राजक्ता तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते.