अभिनेत्री शहनाज गिल पुन्हा प्रेमात; या अभिनेत्यासोबत राहतेय लिव्ह-इनमध्ये?

 प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेता राघव जुयालसोबत लिंकअपच्या बातम्यामुळे चर्चेत आहेत. दोघांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत.

Updated: Apr 17, 2023, 05:21 PM IST
अभिनेत्री शहनाज गिल पुन्हा प्रेमात; या अभिनेत्यासोबत राहतेय लिव्ह-इनमध्ये? title=

मुंबई : अभिनेत्री शहनाज गिल सध्या तिच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री एकेकाळी सलमान खानसोबत रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे चर्चेत होती. मात्र याआधी सिद्धार्थ शुक्लाला डेट करत होती. मात्र अचानक सिद्धार्थचं निधन झालं आणि शहनाजला याचा जबर धक्का बसला होता. या धक्यातून ती हळू-हळू सावरु लागली. आणि आता अभिनेत्री शहनाज सिंगल आयुष्य जगत आहे. मात्र त्यानंतर तिचं नाव अभिनेता सलमान खानसोबत जोडलं जाऊ लागलं. 

 मात्र या सगळ्या अफवांनंतर आता शहनाज  प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेता राघव जुयालसोबत लिंकअपच्या बातम्यामुळे चर्चेत आहेत. दोघांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत. आता दोघंहीलिव्ह-इनमध्ये राहत असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाजने सगळ्यांपासून अंतर ठेवलं होतं. आता अभिनेत्री राघव जुयालसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. आता पुन्हा एकदा शहनाजच्या आयुष्यात प्रेम परतलं असल्याचं बोललं जात आहे.

किसी भाई किसी की जान'मध्ये राघव जुयाल आणि शहनाज गिल पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. अनेक दिवसांपासून शहनाज गिल आणि राघव जुयाल यांच्या अफेअरच्या बातम्या येत आहेत. नुकताच चित्रपटाच्या सेटवरील एका गाण्याच्या शूटिंग दरम्यानचा दोघांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आहे. 

समोर आलेल्या व्हिडिओत दोघंही मस्ती करताना दिसत आहेत. याचबरोबर या दोघांचे एकत्र फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एवढंच नव्हे तर असंही म्हटलं जातंय की दोघंही नुकतेच ऋषिकेशला व्हेकेशनला गेले होते. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्य अफेअर्सच्या चर्चांनी जोर धरला होता. याच बरोबर अशीही चर्चा होऊ लागली की, हे दोन्ही कलाकार लिव्हईनमध्ये राहत आहेत.

शहनाज गिल आणि राघव जुयाल लवकरच सलमान खानच्या 'किसी का भाई, किसी की जान' या चित्रपटात दिसणार आहेत. येत्या 21 एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.