Prajakta Mali नं एका शब्दात केलं राज ठाकरे यांचं वर्णन, म्हणाली...

Prajakta Mali ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राज ठाकरेंविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर प्राजक्तानं एका शब्दात उत्तर दिलं आहे. प्राजक्तानं काही दिवसांपूर्वीच तिच्या 'प्राजक्ताराज' या ब्रॅंडला लॉन्च केले आहे

Updated: Feb 27, 2023, 12:55 PM IST
Prajakta Mali नं एका शब्दात केलं राज ठाकरे यांचं वर्णन, म्हणाली... title=

Prajakta Mali On Mns Leader Raj Thackeray : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्राजक्ता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताची रानबाजार ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. प्राजक्ता माळीची ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या वेब सीरिजमध्ये प्राजक्ता माळीचे बोल्ड सीन पासून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, सध्या प्राजक्ता माळी ही एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहे. प्राजक्तानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Mns Leader Raj Thackeray)  यांचं एका शब्दात वर्णन केलं आहे. 

प्राजक्तानं ही मुलाखत ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला मुलाखत दिली. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या ‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमात प्राजक्तानं हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की प्राजक्ता मनमोकळेपणानं बोलताना दिसत आहे. यावेळी प्राजक्ताला तिच्या खासगी आयुष्यापासून सगळ्या गोष्टींवर प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी प्राजक्तासोबत रॅपिड फायर हा गेम खेळण्यात आला. इतकंच काय तर यावेळी तिला विचारण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर एका शब्दातच उत्तर द्यायचे होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या रॅपिड फायर राऊंडवेळी प्राजक्ताला सगळ्यात आधी राज ठाकरेंचं नाव घेत हा खेळ सुरु केला. राज ठाकरेंचे नाव येताच प्राजक्तानं 'डायनॅमिक' असे उत्तर दिले. (Dynamic या शब्दाचा अर्थ चैतन्य असलेली स्पोर्टी व्यक्ती) असा केला. पुढे तेजस्विनी पंडितचं नाव घेण्यात आले. या प्रश्नावर उत्तर देत उत्साही असं प्राजक्ता म्हणाली. पुढे सई ताम्हणकरचे नाव घेताच प्राजक्ता प्रेरणादायी असं म्हणाली. अमृता खानविलकरसाठी रत्न असा शब्द प्राजक्ता म्हणाली. तर सगळ्यात शेवटी सगळ्यांचा लाडका ललित प्रभाकरचं नाव घेताच हॅण्डसम हंक असं उत्तर प्राजक्तानं दिलं.  

हेही वाचा : Pooja Bhatt Birthday Special : रिलेशनशिपमध्ये पूजा भट्टला जबर मारहाण

दरम्यान, याच शोमध्ये अभिनेत्री ऋतुजा बागवेनं ही गोष्ट मान्य केली की प्राजक्ता माळी ही तिची लेडी क्रश आहे. इतकंच काय तर प्राजक्ताची लेस्बियन पार्टनर व्हायला तिला आवडेल. याशिवाय, प्राजक्ता माळीचा नुकताच अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात ती श्री श्री श्री रवीशंकर यांना 'खरंच लग्न करणं गरजेचं आहे का?' हा प्रश्न विचारताना दिसली. विशेष म्हणजे तिच्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.