Sridevi Death Anniversary: मैत्रीणीच्याच पतीवर जडला श्रीदेवीचा जीव; पाठीत खुपसला खंजीर

Sridevi Death Anniversary: हा काळ आहे 1996 चा जेव्हा श्रीदेवी (Sridevi Death) यांच्याशी सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते बॉनी कपूर यांनी लग्न केले होते. त्यावेळी श्रीदेवी या अभिनयात सर्वात लोकप्रिय अशा अभिनेत्री होत्या. 

Updated: Feb 24, 2023, 05:30 PM IST
Sridevi Death Anniversary: मैत्रीणीच्याच पतीवर जडला श्रीदेवीचा जीव; पाठीत खुपसला खंजीर title=

Sridevi Death Anniversary: लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी यांची आज पाचवी पुण्यतिथी आहे. आत्तपर्यंत श्रीदेवी (Sridevi Death Anniversary) यांच्या अभिनयाबद्दल आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप जास्त बोललं आणि लिहिलं गेलं आहे. त्यातून आता पुन्हा एकदा त्यांच्याबद्दल लिहिलं आणि बोललं गेलं आहे. श्रीदेवी यांच्या मृत्यूबद्दलही भरपूर गोष्टी चर्चेत आल्या आहेत. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता परंतु त्यांच्या मृत्यूचं गूढ अद्यापही कायम आहे. दुबईमध्ये (Dubai) एका हॉटेलमध्ये त्यांचा अचानक मृत्यू झाला त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ माजली होती. त्यांच्या मृत्यूबद्दल आजही चर्चा होते परंतु त्यातूनही आजही त्यांच्या लव्ह लाईफबद्दल चर्चा केली जाते. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या प्रेमाची कहाणीही अनेकदा चर्चेत असते. 

बॉलिवूडमध्ये अशी बरीच लग्न झाली आणि मोडली देखील. त्यातून ब्रेकअपनंतर कोण कधी कोणाच्या प्रेमात पडले आणि कोण कधी कुणाशी लग्न करेल याचा काहीच भरवसा नाही. त्यातून लग्न मोडल्यानंतर आता एखादी व्यक्ती कोणाशी लग्न करेल हेही आपल्याला सांगता येत नाही. त्यातून बोनी कपूर यांच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चांनाही मोठ्या प्रमाणात उधाण आलं होतं. हा काळ आहे 1996 चा जेव्हा श्रीदेवी (Sridevi Death) यांच्याशी सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते बॉनी कपूर यांनी लग्न केले होते. त्यावेळी श्रीदेवी या अभिनयात सर्वात लोकप्रिय अशा अभिनेत्री होत्या. माधूरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि जूही चावला यांच्याही पुढे श्रीदेवी यांचा नंबर होता. त्यातून बोनी कपूर यांचेही नावं खूप मोठे होते. त्यामुळे ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि त्यानंतर त्यांनी एकमेकांशी लग्न केलं. 

बोनी कपूर यांची पहिल्या पत्नी कोण होत्या? 

मौना कपूर म्हणजे मौना शौरी बोनी कपूर (Bonney Kapoor) यांच्या पहिल्या पत्नी होत्या. मौना कपूर आणि बोनी कपूर यांना अर्जून कपूर (Arjun Kapoor) आणि अशुंला कपूर (Anshula Kapoor) अशी दोन मुलंही आहेत. त्यामुळे इतका चांगला हसता खेळता परिवार असताना बोनी कपूर हे श्रीदेवी यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. तेव्हा त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. मौना यांचे 2012 साली निधन झाले होते. अभिनेता अर्जून कपूर यानं अनेकदा आपल्या मुलाखतीतून हे सांगितले आहे की, या घटस्फोटाचा त्यांच्या आयुष्यावर खूप परिणाम झाला होता. 

मौना कपूर यांची श्रीदेवी यांच्याशी मैत्री कशी होती? 

श्रीदेवी आणि मोना यांची मैत्रीही चांगली होती. त्या एकमेकांच्या जवळच्या मैत्रीणीही होत्या. त्या एकमेकांच्या घरीही राहायचे. एवढंच नाही तर त्या बोनी कपूर यांना भाऊ मानून राखीही बांधत होत्या अशीही माहिती रिपोर्ट्सनुसार कळते. 

सख्खी मैत्रीणीच कशी झाली सवत? 

बोनी कपूर आणि श्रीदेवी यांचे प्रेम प्रकरण ऐवढे गाजले होते की, मौना यांना त्यांचे लग्न वाचविण्याचा कोणताच मार्ग उरला नव्हता. तेव्हा खूप वेळही निघून गेला होता कारण श्रीदेवी यां बोनी कपूर यांच्यापासून गरोदर होत्या. याचा मौना आणि त्यांच्या मुलांना खूप मोठा धक्का बसला होता. बोनी कपूर हे नंतर श्रीदेवी (Sridevi Marriage) यांच्यासोबत राहायलाही गेले होते. त्यामुळे याचा धक्काही मौना कपूर पचवू शकल्या नव्हत्या. श्रीदेवी यांना आणि बोनी कपूर यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर अशा दोन मुलीही आहेत.